आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The First White Population Decline In The United States; Report Of 2020, The Percentage Of The Asian Community Increased

जनगणना:अमेरिकेमध्ये पहिल्यांदाचश्वेतवर्णीय लोकसंख्येत घट; 2020 चा अहवाल, आशियाई समुदायाचा टक्का वाढला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फीनिक्समध्ये लाेकसंख्येत जास्त वाढ, न्यूयाॅर्क अव्वल

अमेरिकेच्या श्वेतवर्णीय लाेकसंख्येत पहिल्यांदा घट झाली आहे. अमेरिकेचा पाॅप्युलेशन ब्यूराेच्या २०२० च्या अहवालात याबाबतचा दावा करण्यात आला आहे. गुरुवारी यासंबंधी अहवाल जारी करण्यात आला आहे. २०१० पासून देशात श्वेतवर्णीय लाेकसंख्येत ८.६ टक्के घट दिसून येत हाेती. आता श्वेतवर्णीयांचे अमेरिकी लाेकसंख्येमध्ये ५८ टक्के एवढे प्रमाण आहे. पहिल्यांदाच या समुदायाचा टक्का ६० टक्क्यांहून खाली गेला आहे. हे पहिल्यांदाच दिसून येत आहे. दशकभरात अल्पसंख्याक समुदायांत उल्लेखनीय वाढ झाली आहे. हिस्पॅनिक किंवा लॅटिन लाेकसंख्या २३ टक्के वाढली. कृष्णवर्णीय लाेकसंख्येत ५.६ टक्के वाढ झाली. अमेरिकेत आशियाई लाेकांच्या लाेकसंख्येतही ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जनगणना ब्यूराे अधिकारी निकाेलस जाेन्स म्हणाले, अमेरिकेची लाेकसंख्या पूर्वीपेक्षा व्यामिश्र, विविध समुदाय, विविध वंशीय अशा स्वरूपाची दिसून येते. याबाबतीत जास्त विविधता असलेल्या राज्यात हवाई, कॅलिफाेर्निया, नेवाडा, टेक्सास, मेरीलँड, वाॅशिंग्टन डीसी, न्यूजर्सी, न्यूयाॅर्क आहेत. टेक्सासमध्ये श्वेत व हिस्पॅनिक लाेकसंख्या समान आहे. श्वेत ३९.७ टक्के हिस्पॅनिक ३९.३ टक्के आहे.

फीनिक्समध्ये लाेकसंख्येत जास्त वाढ, न्यूयाॅर्क अव्वल
जनगणनातज्ञ मार्क पेरी म्हणाले, देशातील वाढत्या लाेकसंख्येच्या मागे महानगरीय क्षेत्र कारणीभूत आहे. सरासरी लहान शहरांतील लाेकसंख्या कमी झाली आहे.माेठ्या शहरांत सर्वाधिक ११.२ टक्के लाेकसंख्येतील वाढ फीनिक्समध्ये दिसून आली आहे. न्यूयाॅर्क सिटीमध्ये अजूनही सर्वाधिक ८८ लाख लाेक राहतात.

श्वेतवर्णीय-कृष्णवर्णीयांचा राजकीय नकाशा बदलणार
जनगणनेचे नवे आकडे नव्या राजकीय नकाशाला रेखाटू शकतात. त्याचा परिणाम संसदेतील प्रतिनिधींच्या निवडणुकीवरही हाेऊ शकताे. देशात डेमाेक्रॅटिक पक्षाचे सरकार आहे. कृष्णवर्णीय समुदायाकडे व्हाेट बँक म्हणून पाहिले गेले. रिपब्लिकन पार्टीने पूर्वीपासूनच श्वेत समुदायाच्या लाेकसंख्येत घट झाल्याचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...