आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ब्रिटीश संशोधकांनी लसीच्या चौथ्या डोसविषयी महत्वपूर्ण दावा केला आहे. त्यांच्या मते, फायझर व मॉडर्ना लसीचा चौथा डोस सुरक्षित असून, यामुळे तिसऱ्या डोसच्या तुलनेत शरिरात जास्त इम्यूनिटी तयार होते. हे संशोधन द लांसेट इन्फेक्शिअस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
ब्रिटनमध्ये दिली जात आहे 'स्प्रिंग बूस्टर'
ब्रिटीश सरकार रोगप्रतिकारक क्षमता दुबळी असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीचा चौथा डोस देत आहे.
ब्रिटीश सरकार इम्यूनिटी कमकूवत असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीचा चौथा डोस देत आहे. त्याला स्प्रिंग बूस्टर म्हणून ओळखले जात आहे. संशोधकांच्या मते, या संशोधनाचा संपूर्ण डेटा उजेडात येण्यापूर्वी जनतेतील अँटीबॉडीचा स्तर अबाधित ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून डोस दिला जात आहे. चालू वर्षाच्या अखेरीस उर्वरिति जनतेलाही हा डोस दिला जाईल.
166 जणांवर संशोधन
या संशोधनात 166 जणांचा समावेश होता. त्यांनी गतवर्षी जून महिन्यात फायझर किंवा अॅस्ट्राझेनेका लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर फायझरचा तिसरा डोस घेतला होता. लसीच्या मिक्स अँड मॅचच्या या संशोधनात सहभागी लोकांना फायझरचा संपूर्ण डोस किंवा मॉडर्नाचा अर्धा डोस चौथा डोस म्हणून देण्यात आला. तिसऱ्या व चौथ्या डोसमध्ये 7 महिन्यांचे अंतर ठेवण्यात आले.
चौथ्या डोसचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत
चौथ्या डोसमुळे नागरिकांत थकवा व हातात काहीवेळ वेदना होण्याचे किरकोळ लक्षणे दिसून आली.
वैज्ञानिकाच्या मते, लसीचे साइड इफेक्ट्समध्ये लोकांना थकवा व हातातील वेदना वगळता अन्य कोणत्याही वेदना जाणवल्या नाही. म्हणजे हा डोस लोकांनी चांगल्या प्रकारे सहन केला. यामुळे लसीचा चौथा डोस सुरक्षित व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले. स्प्रिंग बूस्टरमुळे जनतेतील रोगप्रतिकारक क्षमता पूर्वीच्या बूस्टरपेक्षा चांगली वाढल्याचे स्पष्ट झाले.
चौथ्या डोसचा कमकूवत इम्यूनिटी असणाऱ्यांना फायदा
COV-BOOST ट्रायल नामक हे संशोधन यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल साउथम्प्टनच्या वैज्ञानिकांनी केले आहे. संशोधनात सहभागी प्रो. साउल फाउस्ट म्हणाले -संशोधनाअंती स्प्रिंग बूस्टरमुळे अधिक संवेदनशील नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता चांगल्या प्रकारे वाढल्याचे स्पष्ट झाले. यामुळे यूकेच्या शरद ऋतूतील बूस्टर डोसप्रती विश्वासाचे वातावरण तयार होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.