आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुली वडिलांच्या लाडक्या असतात आणि मुलींचा पहिला हीरो वडील असतात, असे आपण ऐकत आलो आहोत. परंतु किशोर आणि तरुणपणाच्या मध्यावर दोघांमध्ये दुरावा निर्माण करणारे एक असे वळण असते. या टप्प्यावर मुली मनातील गोष्टी वडिलांना सांगणे बंद करतात. वडिलांनी दिलेले सल्ले त्यांना आवडेनासे होतात. अनेकदा तर त्या बंडखोर भूमिका घेऊ लागतात. अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. १४ ते २२ वयोगटातील २६% तरुण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वडिलांपासून अंतर ठेवू लागतात. परंतु युवा व पित्यामधील हा दुरावा फार काळ राहत नाही. बहुतांश प्रकरणांत मुलेच ही दरी दूर करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यातही यात मुलींचा जास्त पुढाकार असतो. त्या मुलांच्या तुलनेत मुलींचे वडिलांवर रुसण्याचे प्रमाण २२ टक्के जास्त असते. आईपासून दुरावा निर्माण होण्याची शक्यता किंवा रुसण्याचा विचार केल्यास मुलगा किंवा मुलगी दोघांनाही वडिलांच्या तुलनेत आईपासून दूर राहण्याची शक्यता केवळ ६%असते. ओहियो विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ प्रोफेसर रिन रेकजेक म्हणाले, किशोरावस्थेतून युवावस्थेतील जाण्याच्या काळात अनेक शारीरिक, मानसिक व सामाजिक बदल होत असतात. त्यात शाळेतून महाविद्यालयात जाणे, नोकरी, विवाह इत्यादी. या स्थित्यंतराच्या काळात वडिलांच्या मतांशी ही पिढी सहमत नसते. संशोधनानुसार वडिलांपासून दुरावा निर्माण होण्याचे मुलांचे सरासरी वय २३ वर्षे आहे तर आईशी अंतर निर्माण होण्याचे सरासरी वय २६ वर्षे असते. विवाहित तसेच घटस्फोटित मुले-मुलींचा आई-वडिलांशी जास्त दुरावा दिसून येतो. परंतु त्यांना मुले होतात तेव्हा त्यांच्या विचारांत बदल होतो. अशा पालकांची आपल्या आई-वडिलांशी जवळीक वाढते. दुराव्यानंतर जवळ आल्यानंतर मुलगी आईच्या व मुलगा वडिलांशी जास्त जोडल्या जातो. ८७% समलैंगिक मुलांचे वडिलांशी जास्त अंतर असते. अनेकदा तर त्यांच्यात साधे संभाषणही नसते. संशोधकांनी १९९४ ते २०१८ अशी २४ वर्षे दोन वेगवेगळ्या पिढ्यांचा अभ्यास केला. त्यानुसार आजची पिढी पालकांपासून जास्त दूर आहे. आजचे तरूण गेल्या पिढीच्या तुलनेत आई-वडिलांवर जास्त नाराज आहेत.संशोधनात ८,४९५ जणांचा सहभाग होता.
वडिलांनी समजूतदारपणे मुलांशी संवाद साधल्यास दुरावा जाऊ शकतो प्रोफेसर रिन रेकजेक म्हणाले, मुले आणि पालकांनी आपल्यातील दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिकलेले आणि नोकरी करणारे वडील हे काम सहजपणे करू शकतात. त्यासाठी वडिलांनी आपल्या मुलांशी संवाद साधण्याची गरज असते. मुले स्वतंत्र विचार करत असलेल्या विषयांत आपले निर्णय त्यांच्यावर थोपवू नयेत. त्यांचे विचार ऐकून घ्यावेत. अनेकदा काही बदल करून मुलांचे विचार ऐकून घेतल्याने फार नुकसान होत नाही, हे लक्षात घ्यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.