आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Government In Britain Is Ready For Vaccination From Next Month; Pfizer Claims That The Corona Vaccine Is 90% Effective

सुखद वृत्त:ब्रिटनमध्ये पुढील महिन्यापासून सरकार लसीकरणास सज्ज; कोरोना लस ९०% प्रभावी असल्याचा फायझरचा दावा

न्यूयॉर्क/लंडन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इकडे चीनच्या लसीची चाचणी थांबवून ब्राझीलने चकित केले

आमची लस कोरोना रोखण्यात ९०% पर्यंत प्रभावी ठरू शकते, असा दावा अमेरिकेतील औषधी कंपनी फायझरने केला आहे. फायझरचे वैद्यकीय विकास उपाध्यक्ष डॉ. बिल ग्रुबेर यांनी सांगितले की, लसीबाबत त्यांच्या कंपनीची चाचणी योग्य दिशेने जात आहे. कंपनी यासाठी अमेरिकी नियामकांकडे लवकरच अर्ज देऊ शकते. निकालामुळे आम्ही उत्साहित आहोत. फायझरच्या दाव्यानंतर इंग्लंडचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, इंग्लंडमध्ये पुढील महिन्याच्या सुरुवातीला लसीचा पहिला डोस दिला जाईल. सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना डोस दिला जाईल.

अमेरिकेसह सहा देशांत ४४ हजार लोकांवर फायझरने केली चाचणी

फायझरने अमेरिकेसह ६ देशांमध्ये सुमारे ४४ हजार लोकांना लसीच्या चाचणीत सहभागी केले होते. याबाबत सविस्तर माहिती फायबरने दिलेली नाही. त्यांनी म्हटले आहे की, संशोधनाच्या शेवटपर्यंत निकालात बदल होऊ शकतो. फायझर आणि जर्मनीतील तिची सहायक कंपनी बायोएनटेकही कोरोना लस तयार करण्याच्या स्पर्धेत आहेत. आणखी एक अमेरिकी कंपनी मॉडर्नानेही म्हटले आहे की, या महिन्यात ते अन्न व औषधी प्रशासन नियामकाकडे अर्ज दाखल करू शकतात.

बोरिस म्हणाले- सतर्क राहा, बायडेन म्हणाले- संशोधकांना धन्यवाद

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही फायझरच्या घोषणेचे स्वागत केले आहे. मात्र, त्यांनी इशाराही दिला आहे की, नव्या संभाव्य लसीने फक्त एक अडथळा पार केला आहे. यामुळे लोकांनी सावधानता बाळगायला हवी. लॉकडाऊनचे पालन करावे लागेल. दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी फायझरला शुभेच्छा दिल्या आहेत. बायडेन यांनी म्हटले की, संशोधनात मदत करणारे आणि आपल्याला आशा दाखवणाऱ्या लोकांना धन्यवाद.

... इकडे चीनच्या लसीची चाचणी थांबवून ब्राझीलने चकित केले

साओ पावलो | चीनच्या संभाव्य कोरोना लसीची चाचणी थांबवून ब्राझीलने चकित केले. ब्राझीलचे आरोग्य नियामक अॅनव्हिजा यांनी निर्णयाची माहिती वेबसाइटवर दिली आहे. अॅनव्हिजा यांनी म्हटले आहे की, चिनी लस कोरोनावॅकचे गंभीर हानिकारक प्रभाव दिसून असले अाहेत. यामुळे त्याची चाचणी थांबवण्यात आली आहे. कोरोनावॅकला चिनी फार्मास्युटिकल कंपनी सायनोवॅक तयार करत होती. ब्राझीलमध्ये त्याचे बहुतांश उत्पादन साओ पावलो येथील सरकारी संस्था बुटानटॅन इन्स्टिट्यूट करणार होती. बुटानटॅनने दिलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, त्यांना अॅनव्हिजा यांच्या निर्णयाने धक्का बसला आहे. कोरोनावॅकवरून ब्राझीलमध्ये आधीपासूनच वाद आहे. राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांनी तिच्या रक्षात्मक प्रभावाबाबत शंका उपस्थित केली होती. कोरोनावॅकचे ४० कोटी डोस बनवण्यासाठी ब्राझील २७ नोव्हेंबरपासून कच्चा माल आयात करणार होता, तशातच ही चाचणी थांबवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...