आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:ब्रिटनच्या हॉटेल-रेस्तराँ क्षेत्राला उभारी देण्यासाठी सरकारची अनोखी योजना, निम्मे बिल ग्राहक तर उर्वरित सरकार देणार

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘ईट आऊट टू हेल्प आऊट’ ऑफरमधून अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न

ब्रिटनमध्ये सोमवारी सकाळपासून अनेक कुटुंब मॅकडॉल्ड्समध्ये नाश्ता, पिझ्झा एक्स्प्रेसमध्ये दुपारचे जेवण आणि नांदामध्ये रात्रीचे जेवण करण्याची तयारी करत होते. पूर्ण ब्रिटनमध्ये भारतवंशीय अर्थ मंत्री ऋषी सुनक यांच्या पुढाकाराने ‘ईट आऊट टू हेल्प आऊट’ ऑफर सुरु करण्यात आल्याने ही तयारी सुरू होती. या योजनेतंर्गत रेस्तराँमध्ये नाश्ता, जेवण केल्यास केवळ निम्मेच बिल द्यावे लागेल. उर्वरित बिल सरकार देईल. ही ऑफर ३ ते ३१ ऑगस्टदरम्यान सोमवार ते बुधवारपर्यंत लागू असेल. प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त १० पौंड (सुमारे ९८० रुपये) सूट मिळेल. साधारणत: चार लोकांच्या जेवणाचे बिल ३० ते ४० पौंड होते.

कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे लोक बाहेर जे‌वण करणे टाळत होते. यामुळे हॉटेल-रेस्तराँ उद्योग ठप्प झाला होता. या क्षेत्राला उभारी देऊन अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारने यासाठी ५० हजार पौंडचे (४,९०० कोटी रुपये) पॅकेज जाहीर केले आहे. या योजनेशी देशातील निम्मे म्हणजे ७२ हजार रेस्तराँ, पब व कॅफे जोडल्या गेले असून त्यांनी निम्म्या किमतीवर जेवण देण सुरुही केले आहे. यात मॅक्डाेनल्ड‌्स, नांदाे, बर्गर किंग, पिझ्झा हट, स्टारबक्स, पिझ्झा एक्सप्रेस सारख्या ९० ब्रँडचा समावेश आहे. दुसरीकडे मात्र ग्राहकांना रेस्तराँमध्येच जेवण करावे लागेल ही अट यासाठी लागू केली आहे. तसेच अल्कोहलवर सूट मिळणार नाही.

१८ लाख शेफ, वेटर आणि कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवण्यासाठी योजना
सरकारी डेटानुसार, एप्रिलपासून ८०% हॉस्पिटॅलिटी क्षेत्र ठप्प होते. १४ लाख लोकांना रजेवर पाठवले होते. सुनक यांच्यानुसार, रेस्तराँ, कॅफे व पबमध्ये काम करणारे १८ लाख शेफ, वेटर व कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. यामुळे मागणी वाढून लोक रेस्तराँमध्ये जातील.

बातम्या आणखी आहेत...