आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैरो:इजिप्तमधील तरुणाईत कुरळ्या केसांचे वाढते आकर्षण ठरते आहे जणू एक अबोल क्रांती अन् स्वातंत्र्याचे प्रतीक

कैरोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूर्वी कुरळे केस असतील तर शाळेत शिक्षा होत असे, नोकरीही मिळत नसे...

दूरदर्शनवर १९८० मधील एक जाहिरात इजिप्तच्या लोकांना नेहमी आठवते. दोन महिला एका आरशासमोर उभ्या आहेत आणि त्यातील एक म्हणते, “माझे केस कुरळे आहे, ते व्यवस्थित करणे फारच कठीण जाते. लग्नात मात्र याला वेगळी स्टाइल देणे मला आवडेल.’ यावर दुसरी म्हणते, “कुरळे केस समस्या नाही, आपल्याकडे खूप वेळ आहे.’

अनेक दशके इजिप्तच्या महिलांना सतत हेच शिकवण्यात आले की, कुरळे केस ठेवणे योग्य नाही. अर्थात यामागील दृष्टिकोन हा वंशवादाबाबतच्या पूर्वग्रहांमध्ये लपला आहे. याशिवाय, पाश्चिमात्यांचे अनुकरण हा पण यातील मोठा भाग आहे. आता मात्र, इजिप्तची युवा पिढी सर्रास अशा कुरळ्या केसांत वावरताना दिसते.

यातून २०११ मध्ये तत्कालीन हुकूमशहा होस्नी मुबारक यांना हटवण्यासाठी झालेल्या क्रांतीची आठवण येते. आता या देशात कुरळ्या केसांच्या रचनेमुळे सलून आणि इतर उत्पादनांनाही चालना मिळाली आहे. जी-कर्ल्स सलूनच्या मॅनेजर सोराया हाशेम सांगतात, मला त्या टीव्हीवरील जाहिरातीचीच चीड येते. तेव्हा सामाजिक दबाव म्हणून ठीक होते. आता परिस्थिती बदलली आहे. तेव्हा शिक्षक मंडळीही कुरळे केस असतील तर ती केशरचना बदलण्यास सांगत. कुणी नोकरी मागायला गेला तरी कुरळे केस म्हणून नोकरी दिली जात नसे. दीना ओथमेन म्हणते, मला कुरळ्या केसांमुळे नोकरीच्या अनेक संधी गमवाव्या लागल्या.

लोक आता टॅटूही काढतात, परंतु अधिक ओढ कुरळ्या केसांचीच
ऑनलाइन फोरम आणि हेअर केअर कंपनी हेअर अॅडिक्टच्या संस्थापिका डोआ गाविश म्हणतात, मी लोक काय म्हणतील याची चिंता करत नाही. मी ही कंपनी सुरू केली तेव्हा इजिप्त व आखातात माझे ५ लाख फॉलोअर्स माझे चाहते झाले. मी आज माझे कुरळे केस पाहते तेव्हा स्वातंत्र्याची जाणीव होते. डोआ म्हणते, देशात लोक आता टॅटू काढतात, पण बहुतांश युवकांमध्ये कुरळ्या केसांचेच अधिक आकर्षण आहे.

बातम्या आणखी आहेत...