आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्ता बंधूंना अटक:युएईची कारवाई, बुटाचे दुकान चालवणारे गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेत करायचे मंत्र्यांची निवड

सहारनपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी मूळ भारतीय असलेल्या गुप्ता बंधूंना (राजेश आणि अतुल) संयुक्त अरब अमिरातमध्ये अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत सत्तेमध्ये हस्तक्षेप करत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवल्याप्रकरणी इंटरपोलने जुलै २०२१ मध्ये बजावलेल्या रेड कॉर्नर नोटिशीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

गुप्ता कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे. आधी सिंगापूर आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रुपयांचे व्यवसायिक साम्राज्य उभे केले. ९० च्या दशकात गुप्ता बंधू दिल्लीला आले आणि तिथे मसाल्यांचा व्यवसाय केला. यानंतर १९९३ मध्ये त्यांनी नव्या संधीच्या शोधात दक्षिण आफ्रिकेकडे प्रयाण केले. इथे आल्यानंतर त्यांचे नशीब उजळले. दक्षिण आफ्रिकेत त्यांचा संगणक व्यवसाय, मायनिंग आणि प्रसार माध्यमांचा बिझनेस फुलला. पाहता पाहता त्यांची दक्षिण आफ्रिकेतील ताकदवान लोकांमध्ये गणना व्हायला लागली. २०१६ मध्ये गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेचे १६वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. माध्यमांतील वृत्तानुसार, त्या काळात त्यांची संपत्ती सुमारे ७८ कोटी डॉलर (जवळपास ६ लाख कोटी रुपये) इतकी होती.

उत्तराखंड : २०० कोटींचा लग्नसोहळाही चर्चेत राहिला
२०१९ मध्ये अजय गुप्ता यांच्या मुलाचा उत्तराखंड येथील औलीमध्ये झालेला सुमारे २०० कोटी रुपयांचा शाही लग्नसोहळा चर्चेत राहिला. यापूर्वी अजय गुप्ता यांनी दक्षिण आफ्रिकेत आपल्या भाचीचे शाही लग्न केले होते. यासाठी भारतातून गेलेल्या पाहुण्यांचे जहाज बळजबरी तेथील लष्करी विमानतळावर उतरवण्यात आल्याने वाद झाला. अजय गुप्ता यांच्या मोठ्या मुलाचे लग्न तुर्कस्तानातील जगप्रसिद्ध मरदान पॅलेसमध्ये आयोजित केले होते. त्यांची कंपनी सहारा कॉम्प्युटर्स दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीमची प्रायोजक होती.

वादग्रस्त सुरुवात : २०१५ पासून सुरू झाले वाद
गुप्ता बंधूंच्या व्यवसायावर २०१५ मध्ये वादाची सावली पडायला लागली. राजकारणावर त्यांची पकड मजबूत होत चालल्याने ते वादग्रस्त ठरत गेले. जर्मनीच्या एका सॉफ्टवेअर कंपनीला लाच दिल्याचे प्रकरण सaमोर आले. बंधूंच्या एका कंपनीला जर्मन कंपनीने ७० लाख युरोची लाच दिल्याचा आरोप होता.जून २०१७ मध्ये दक्षिण अफ्रिकेच्या माध्यमात २ लाख ईमेल लीक झाले.

युरेनियम, सोन्याच्या खाणीत जुमाची १०% भागीदारी
दक्षिण आफ्रिकेतील गुप्ता बंधूंच्या ज्या कंपन्यांना सोने व युरेनियमच्या खाणी देण्यात आल्या त्यामध्ये जुमाची पत्नी आणि मुलगा संचालक होते. जुमाचा मुलगा दुदुजान जुमा १० टक्के भागीदार होता. त्यांना सफारी म्हणून विकसित जंगलाचा एका मोठ्या शहराइतका भाग दिला होता. बंधुंच्या कंपन्यांत ओकबे रिसोर्स अँड एनर्जी, टिगेटा, शिवा यूरेनियम आदींचा समावेश आहे.

दुबई ते द. आफ्रिका प्रत्यार्पणाची कवायत
राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी गुप्ता बंधूंना अटक करण्याच्या उद्देशानेच यूएई आणि दक्षिण आफ्रिकेच्या मध्यभागी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रत्यार्पणाची संधी दिली होती. रेड कॉर्नर नोटीस बजावत इंटरपोलने सांगितले होते, गुप्ता बंधूंच्या एका कंपनीला देण्यात आलेल्या २.५ कोटी रँडच्या (१२५ कोटी) कंत्राटामध्ये दिलेला धोका आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी आम्ही त्यांच्या शोधात होतो. दोघांच्या अटकेनंतर संयुक्त अरब अमिरात गुप्ता बंधूंना सोपवण्याबाबत मूल्यांकन करत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे कायदे मंत्रालय म्हणाले, घोटाळा दक्षिण आफ्रिकेत झाला होता. त्यामुळे दोघांना दक्षिण आफ्रिकेत कसे आणता येईल, यावर चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...