आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:हृदय नेणारे हेलिकॉप्टर कोसळले, आरोग्य कर्मचारीही पडला; पण हृदय रुग्णापर्यंत पोहोचवूनच घेतला श्वास

लाॅस एंजलिस24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत प्रत्यारोपणासाठी हृदय रुग्णापर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचवले

हृदय नेणारे हेलिकाॅप्टर कोसळले, आरोग्य कर्मचारीही पडला; पण हृदय रुग्णापर्यंत पोहोचवूनच घेतला श्वास. चित्रपटांत असे नेहमीच घडते, पण प्रत्यक्षात ते प्रथमच घडले असावे. लॉस एंजलिसमध्ये हेलिकॉप्टर अॅम्ब्युलन्सने आणले जात असलेले हृदय प्रत्यारोपणाआधीच अपघातग्रस्त झाले. पण आरोग्य, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे ते रुग्णापर्यंत पोहोचवण्यात आले. प्रत्यारोपणासाठी हृदय घेऊन हेलिकॉप्टर सॅन दिएगोहून लॉस एंजलिसकडे निघाले होते. रुग्णालयाच्या छतावरील हेलिपॅडवर लँड होण्याआधीच ते कोसळले. हेलिकॉप्टरचे तुकडे छतावर विखुरले. सुदैवाने पायलट किरकोळ जखमी झाला, दोन आरोग्य कर्मचारी थोडक्यात बचावले. तत्काळ पोहोचलेल्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी हायड्रॉलिक उपकरणाद्वारे हेलिकॉप्टर कापून हृदय ठेवलेला बॉक्स काढला. त्यांनी तो अन्य आरोग्य कर्मचाऱ्याला दिला. तो ऑपरेशन थिएटरकडे घेऊन जाण्यासाठी वेगाने वळला आणि हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याला धडकला. हृदय असलेला बॉक्सही जमिनीवर पडला. सुदैवाने हृदय सुरक्षित राहिले. त्वरित स्वत:ला सावरत कर्मचाऱ्याने ओटीकडे धाव घेतली. त्यानंतर हृदयाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. दान दिल्यानंतर ४ ते ६ तासांतच हृदयाचे प्रत्यारोपण व्हायला हवे. त्यासाठी ही धडपड करण्यात आली.