आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाची दहशत:चीनमध्ये 3 महिन्यांनंतर सर्वाधिक रुग्णसंख्या, रशियात अधिक मृत्यू

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशियापासून युराेपपर्यंत संसर्गात वाढ झाल्याने पुन्हा भीती वाढली

जगभरात काेराेनामुळे आतापर्यंत २४.७४ काेटींहून जास्त लाेकांना संसर्ग झाला. ५०.१ लाखांहून जास्त लाेकांचा मृत्यू झाला. आशियापासून युराेपपर्यंत अनेक देशांत काेराेना पुन्हा भीती घालू लागला आहे. ७६ टक्के लाेकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाल्याचा दावा करणाऱ्या चीनमध्ये पुन्हा काेराेनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. राजधानी बीजिंगमध्ये काेराेनामुळे रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली. चीनच्या आराेग्य आयाेगाने काेविड-१९ च्या नियमांना अधिक कडक केले आहे. बीजिंगचे आराेग्य आयाेग म्हणाले, प्रवास करण्यापूर्वी लाेक बीजिंगला परतले आहेत. या लाेकांनी आपल्या प्रवासाची माहिती स्थानिक समुदाय, हाॅटेल व कंपनीला तत्काळ दिली पाहिजे. त्याचबराेबर स्वत:चे विलगीकरण केले पाहिजे.

रशियात एका आठवड्यापासून लाॅकडाऊन सुरू आहे. त्यानंतरही रशियातील काेराेनाचा संसर्ग कमी झालेला नाही. मंगळवारी ४ हजार ४४३ नवे रुग्ण बाधित असल्याचे समाेर आले आहे. एकाच दिवसात १ हजार १८९ जणांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीनंतरची ही सर्वात माेठी आकडेवारी आहे. पाेलंडमध्ये एका आठवड्यात रुग्णांचे प्रमाण २४ टक्क्यांनी वाढले.

तयारी : नेदरलँडमध्ये कडक नियम लागू
नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी मास्कसह काेराेनाचे प्राेटाेकाॅलला लागू करणे अनिवार्य झाले आहे. ते म्हणाले, संग्रहालय, रेस्तराँ इत्यादी ठिकाणी अंतर राखण्याचा नियम लागू करावा. त्याशिवाय आठवड्यातील निम्मे दिवस लाेकांना वर्क फ्राॅम हाेम करण्यास सांगितले जाईल.

तज्ज्ञांचा इशारा : काेराेना संपल्याचे मानून वागू नका
- महामारी आता संपल्याचे लाेकांना वाटू लागले आहे. थंडीचे काही महिने अधिक कठीण जाऊ शकतात असे मला वाटत असल्याचा इशारा ब्रिटनचे उपमुख्य चिकित्सा अधिकारी प्राेफेसर जाेनाथन वॅन टॅम यांनी दिला.
- जर्मनीचे आराेग्यमंत्री जेन्स पेन बुधवारी म्हणाले, लसीकरण न करणारे लाेक महामारी वाढवू लागले आहेत. ते म्हणाले, डाेस न घेणाऱ्या लाेकांवर कारवाई केली जावी. सतर्कता बाळगली पाहिजे. काेराेनाचे प्राेटाेकाॅल पाळले पाहिजेत.
- युक्रेनच्या आराेग्यमंत्र्यांनी लसीकरणास विराेध दर्शवणाऱ्या लाेकांना फटकारले. आयसीयूमध्ये गेल्यावर लसीकरणाला विराेधाचा िवचारही येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.अनेक देशांत रुग्णसंख्या वाढत आहे.
- हाँगकाँगमध्ये पुढील आठवड्यात बूस्टर डाेस दिला जाणार आहे, अशी माहिती आराेग्य सचिव साेफिया चॅन यांनी दिली. ११ नाेव्हेंबरपासून बूस्टर डोस दिला जाईल.

जगभरात मृतांची संख्या ५० लाखांहून पार
जगभरात १ नोव्हेंबरपर्यंत ५० लाखांहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु तज्ज्ञ म्हणाले, ही संख्या कमी आहे. वास्तवात प्राण गमावणाऱ्यांची संख्या कित्येकपट जास्त आहे. कोरोनामुळे सुमारे १.७ कोटी लोकांनी प्राण गमावले आहेत, असे तज्ज्ञांना वाटते. ५० लाख मृत्यू गेल्या वर्षी १ डिसेंबरपर्यंत झाले होते. १ नोव्हेंबर रोजी मृतांची संख्या १.०३ कोटीच्या दरम्यान आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली असे म्हणता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...