आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जॉइस फर्नांडिस तिच्या तिसऱ्या पिढीतील मोलकरीण होती. ती एका अपार्टमेंटमध्ये घराची देखरेख आणि स्वच्छतेचे काम करायची. जॉइस अनेक तास बुक शेल्फ स्वच्छ करायची. दरम्यान, जाॅइसला ‘ओल्गा : रिव्होल्युशनरी अँड मार्टियर’ नावाचे पुस्तक दिसले. ते तिने वाचणे सुरू केले. मालक बाहेर गेल्यानंतर ती पुस्तक वाचायची. जर मालकाने पुस्तक वाचताना पाहिले तर नोकरी जायची तिला भीती होती. मात्र, एके दिवशी मालकाने तिला पुस्तक वाचताना पाहिले. त्याने जॉइसला बोलवले आणि तिचे कौतुक केले. नंतर पुस्तके वाचायला प्रोत्साहन दिले. जॉइसने पुस्तके वाचणे सुरू केले. महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि २०१२ मध्ये पदवी मिळवली. यानंतर जॉइसने मोलकरणींच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले, जे ब्राझीलमध्ये चर्चेचा विषय झाले. जॉइसने टीव्हीवर काही कार्यक्रमही घेतले. येथे तिने मोलकरणी आणि वंशवादाबाबत मुद्दे उपस्थित केले. नंतर कलेद्वारे आपला आवाज बुलंद केला आणि रॅपर झाली. आता जॉइस फर्नांडिस ब्राझीलचे स्टार झाली आहे. लोक तिला प्रेटा रारा म्हणजे अद्वितीय कृष्णवंशीय महिला नावाने बोलवतात.
घरमालक केवळ उरलेले जेवण द्यायचा
३५ वर्षांची जॉइस सांगते, ज्या घरांमध्ये तिने मोलकरणीचे काम केले तेथे केवळ उरलेले जेवण तिला खायला दिले जायचे. बाथरूम वापरण्यावरही बंधन होते. पाय धुऊन घरात प्रवेश मिळायचा. नुकसान केल्यास त्रास दिला जायचा. ही केवळ तिचीच कहाणी नाही तर बहुतांशी मोलकरणींची स्थिती होती. त्या काळात उदार मालक भेटणे भाग्याची गोष्ट होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.