आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Illusion Of Discount In Online Shopping; By Increasing The MRP, They Show Huge Discounts On It, Charge Higher Prices

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइन शॉपिंगमध्ये सवलतीचा भ्रम; एमआरपी वाढवून त्यावर प्रचंड सवलत दाखवतात,आकारतात जास्त किंमत

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सणासुदीचा हंगाम असो किंवा वर्षअखेरीचा ऑनलाइन सेल असो, प्रत्येक साइटवर बंपर डिस्काउंट ऑफर आहे. किमती कमी करून ग्राहकांचे स्वागत केले जात असल्याचे दिसून येत आहे. पण बाजार नफ्याच्या अर्थशास्त्रावर चालतो. किरकोळ विक्रेता कधीही तोट्यात व्यवसाय करत नाही. ऑनलाइन सवलतीचा खेळ समजून घेण्यासाठी अमेरिकेच्या फ्लोरिडा व नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाने एक संशोधन केले. यानुसार, ऑनलाइन सवलती देताना प्रत्यक्ष एमआरपी (कमाल विक्री दर) वाढवून विक्रेता वतीने सवलतीचा दावा करतो. तसेच ग्राहकांसाठी फायदेशीर व्यवहार असल्याचा भ्रम निर्माण करतो. ग्राहकाला असे वाटते की त्याला स्वस्त किमतीत वस्तू मिळत आहे.

हे प्रत्यक्षात घडत नसले तरी, विक्रेता ज्या किमतीला वस्तू विकण्यास तयार आहे ती किंमत ग्राहक मोजतो आहे. मार्केटिंग सायन्समध्ये प्रकाशित संशोधनानुसार, विक्रेते ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर सूट देऊन त्यांची विक्री वाढवतात. त्याच वेळी, ते चतुराईने नफ्याचे प्रमाणही वाढवतात. ऑनलाइन सवलतीच्या विक्रीत सर्वाधिक खरेदी डिजिटल कॅमेरे, मोबाइल, टेलिव्हिजन व कपड्यांची होते. डिस्काउंट ऑफरमध्ये ग्राहक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सकडे सर्वाधिक आकर्षित होतात. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर डिस्काउंटच्या दाव्याची सत्यता मोजण्यात ग्राहक अक्षम असतात. काही ऑफरमध्ये, किरकोळ विक्रेत्यांनी किमती २५% पर्यंत वाढवून नफा कमावल्याचेही दिसून अाले. ऑनलाइन शाेधामुळे किंमत वाढते तुम्हाला वेबसाइटवर १०० रुपये किंमत असलेले उत्पादन दिसले आणि नंतर दुसऱ्या दिवशीदेखील त्यात शाॅपिंग साइटला भेट दिली, तर त्या उत्पादनाची किंमत २०० रुपये दर्शविली जाते. किरकोळ विक्रेते त्यात २५% ची सवलत देतात आणि उत्पादनास १५० रुपये किंमत सांगून सूचीबद्ध करतात. ही चांगली सूट मानून ग्राहक उत्पादन खरेदी करतो. मात्र सवलत असूनही या किमती आदल्या दिवशीच्या किमतींपेक्षा जास्त असतात. ग्राहक सवलतीत अधिक पैसे देऊन समान, उत्पादने खरेदी करत आहे.

ग्राहकांनी एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या वेबसाइटवर तपासावी {डिस्काउंट ऑफरवर खरेदी करण्यापूर्वी, ग्राहकाने वेगवेगळ्या वेबसाइटवर एकाच उत्पादनाच्या किमती तपासल्या पाहिजेत. उत्पादन किंमत बदलाच्या इतिहासावरून सवलत तपासा. {कोणतीही सवलत ऑफर पाहून, खरेदीची घाई करू नये. इंटरनेटच्या युगात, सवलतीच्या सूचना ग्राहकांना उत्पादन खरेदी करण्यास प्रोत्साहित करतात, ते टाळा.

बातम्या आणखी आहेत...