आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने(आयसीसी) शुक्रवारी युक्रेन प्रकरणात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. यामध्ये पुतीन यांच्यावर युक्रेनमध्ये केलेल्या युद्धगुन्ह्यांसाठी जबाबदार असल्याचा आरोप लावला आहे. आयसीसीने मुलांचे अवैध स्थलांतर आणि युक्रेन क्षेत्रातून रशियन संघात लोकांच्या अवैध स्थलांतराच्या संशयात पुतीन यांच्या अटकेचा आदेश जारी केला आहे. आयसीसीच्या अटक वॉरंटवर रशियाने उत्तर दिले नाही. मात्र, वॉरंट जारी होण्याची शक्यता आधीपासूनच होती. याशिवाय न्यायालयाने रशियाच्या बाल हक्क आयुक्त मारिया लावोवा-बेलोवा यांच्यासाठी अशाच आरोपांबाबत वॉरंट जारी केले आहे. आयसीसी फिर्यादी करीम खान यांनी वर्षभरापूर्वी युक्रेनमधील संभाव्य युद्ध गुन्हे, मानवतेविरुद्ध गुन्हे व नरसंहाराची चौकशी सुरू केली होती. युक्रेनच्या चार दौऱ्यांदरम्यान त्यांना दिसले की, रशियन लष्कर मुलांविरुद्ध कथितरीत्या गुन्हे आणि नागरिक पायाभूत सुविधांवर निशाणा बनवत होते. युक्रेनी राष्ट्राध्यक्ष म्हणाले, कोर्टाचा निर्णय रशियाच्या आक्रमणावर न्याय पुनर्स्थापित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे.
पुतीन यांच्यावर फरक पडणार नाही सध्याची स्थिती पाहता पुतीन हा निकाल मानतील असे वाटत नाही. ते पहिल्या दिवसापासून युक्रेनला धडा शिकवण्याची धमकी देत आहेत. रशियाकडे यूएनएससीची व्हेटो पॉवर आहे. अशात सर्वोच्च न्यायालय रशियावर दबाव टाकू शकत नाही.
जिनपिंग रशियाला जाणार : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग २० ते २२ मार्चपर्यंत रशियाच्या दौऱ्यावर असतील. १० वर्षांपासून पुतीन यांच्या जवळ राहिलेले जिनपिंग युद्ध समाप्त करण्यासाठी रशिया व युक्रेनमध्ये शांतता चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.