आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Japan Government Will Provide Up To Rs 4 Lakh To Couples Getting Married In Japan To Increase The Declining Birth Rate, With The Scheme To Be Implemented From April.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:घटता जन्मदर वाढवण्यासाठी जपानमध्ये लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकार 4.25 लाखांपर्यंत रक्कम देणार, एप्रिलपासून योजना लागू

टोकियो8 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • वृद्धांचा देश जपानमध्ये आर्थिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात युवकांचा लग्न टाळण्याकडे कल

जपानमध्ये संसार थाटण्यासाठी इच्छुक जोडप्यांना ६ लाख येन म्हणजे सुमारे ४.२५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील वेगाने घटणाऱ्या जन्मदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांनी लवकरात लवकर लग्न करून अपत्य जन्माला घालावे, यासाठी ही योजना लागू करण्यात येत आहे. यासाठी एप्रिलपासून सरकार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवणार आहे.

जपानमध्ये गतवर्षी सर्वात कमी ८,६५००० बालकांचा जन्म झाला. दुसरीकडे या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण ५ लाख १२ हजारांनी जास्त होते. हे जन्म आणि मृत्युदरातील आतापर्यंतचे सर्वाधिक अंतर आहे. दरम्यान, यंदा जन्मदर गतवर्षीपेक्षा १.८% जास्त असेल, असा अंदाज आहे. जपानची लोकसंख्या १२.६८ कोटी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जपान जगातील सर्वात वृद्ध देश आहे. येथे १०० पेक्षा जास्त वय असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, जन्मदर असाच राहिल्यास २०४० पर्यंत वृद्धांची संख्या ३५% वर जाईल. हे अंतर कमी करण्यासाठी सरकारने अभियान सुरू केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. यानुसार, जोडप्याचे वय ४० पेक्षा जास्त नसावे तसेच दोघांचे एकत्रित उत्पन्न ३८ लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच ३५ पेक्षा कमी वयाच्या जोडप्यांचे उत्पन्न ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. त्यांना २.११ लाख रुपयांची मदत दिली जाईल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्चने २०१५ मध्ये एक सर्वेक्षण केले होते. यात २५-३४ वयोगटातील सुमारे ३०% अविवाहित मुले आणि १८% अविवाहित मुलींनी पैशांच्या कमतरतेमुळे लग्नास नकार दिल्याचा निष्कर्ष समोर आला होता.

इटलीमध्ये अपत्यप्राप्तीनंतर मिळतात ७० हजार रुपये, तर एस्टोनियामध्ये दीड वर्षाच्या पूर्ण पगारासह रजा

इटली : येथेही जन्मदरात घटत आहे. येथे अपत्यप्राप्तीनंतर जोडप्याला सरकारकडून ७० हजार रुपये मिळतात. सोबत के‌वळ एक युरोत म्हणजे ८० रुपयांत घर आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी करात सूट दिली आहे.

इराण : रुग्णालये व वैद्यकीय केंद्रांवर पुरुषांच्या नसबंदीवर बंदी आहे. गरज असलेल्या महिलांनाच गर्भनिरोधक औषधेही दिली जातात. तसेच जास्त मुले जन्माला घालणाऱ्या कुटुंबास अतिरिक्त रेशन मिळते.

एस्टोेनिया : या युरोपीय देशात जन्मदर वाढवण्यासाठी नोकरी करणाऱ्याला दीड वर्षापर्यंत पूर्ण पगारासह रजा मिळते. तीन अपत्ये असलेल्या कुटुंबाला दर महिन्याला ३०० युरो म्हणजे जवळपास २५ हजारांचा बोनस मिळतो.

बातम्या आणखी आहेत...