आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानमध्ये लोकसंख्येचा वाढता डोंगर पाहता सरकार महानगरांवरील ताण कमी करण्यासाठी नागरिकांना महानगर सोडण्यासाठी प्रत्येकी मुलास सुमार ६ लाख ३६ हजार रुपये देत आहे. या आर्थिक मदतीतून ते ग्रामीण भागात स्थायिक होतील, असे सरकारला वाटते.
तरुण पालकांनी टोकियो सोडून ग्रामीण भागात जाण्यास तयार असल्यास त्यांना आर्थिक मदतीव्यतिरिक्त इतर मदत करण्याचीही सरकारची तयारी आहे. २०२७ पर्यंत सुमारे १० हजार नागरिक टोकियाेच्या ग्रामीण भागात जाऊन वसतील, अशी सरकारला अपेक्षा वाटते. जगातील काही देश वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त आहेत. त्यात भारत, चीन व जपानचा समावेश आहे. दिल्लीसह टोकियोपर्यंत राजधानीच्या शहरावर लोकसंख्येचा ताण वाढत चालला आहे. वाढत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी जपान सरकारने अनोखी योजना जाहीर केली आहे. टोकियो लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे शहर ठरते. शहराची लोकसंख्या ३.८ कोटी एवढी आहे. जपानच्या लोकसंख्येत वेगाने बदल होत असल्याचे दिसून येते. मुलांची संख्या वेगाने घटत आहे. ६५ वर्षांहून जास्त वयाच्या लोकांची संख्या वाढत आहे.
सरकारने सर्व पातळ्यांवर प्रयत्न करूनदेखील मुलांची संख्या वाढत नसल्याचे दिसून येते. जपानमध्ये अनेक गावे ओस पडली आहेत. अशा गावांकडे चला, अशी हाक सरकारने या माध्यमातून दिली आहे. त्यासाठी चाइल्ड केअरचीही प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. नागानो प्रांतात ओटारी गावात लोकसंख्येचा आढावा घेण्यात आला.
शहर सोडून जाणाऱ्यांना रोजगारही
शहर सोडून जाणाऱ्यांना जपान सरकार रोजगार देखील उपलब्ध करून देत होते. परंतु २०२१ मध्ये केवळ २४०० नागरिकांनीच या योजनेची निवड केली होती. म्हणजे टोकियोच्या लोकसंख्येपैकी केवळ ०.००६ टक्के लोकांनीच योजनेला प्रतिसाद दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.