आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Lanka Of Gold Sank Under The Weight Of Concessions; Emergency In Neighboring Nation |marathi News

श्रीलंका आर्थिक संकटात:सवलतींच्या भाराने सोन्याची लंका बुडाली; कर्जाच्या जाळ्यात अडकल्याने देशात आणीबाणी, गरजेच्या वस्तुंचाही तुटवडा

श्रीलंका4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेत ७५ वर्षांतील गडद आर्थिक संकट, ऐतिहासिक मंदी व महागाईने त्रस्त लोकांचा सामना करण्यासाठी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षेंनी आणीबाणी लागू केली आहे. शनिवारपासून ३६ तासांचे लॉकडाऊन जाहीर करून रस्त्यावर लष्कर तैनात केले. विशेष म्हणजे कोरोनामुळे पर्यटन ठप्प पडल्याने, बेहिशेबी विदेशी कर्ज आणि निवडणूक आश्वासने व करकपातीमुळे खजिना रिकामा झाला. परकीय चलनसाठा कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलची आयात करणेउकठीण झाले. राजकीय विश्लेषक आणि स्तंभ लेखक कुसल परेरा म्हणाले की, “महागाई आणि गरजेच्या वस्तूंच्या तुटवड्यामुळे लोक करतील तरी काय? रोष कधीही हिंसक ठरू शकतो.

“ डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन रुपया ७ मार्चपासून सुमारे ६०% घसरला. कोलंबोत पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा टॅक्सीचालक शनाका सिल्वा म्हणाले की, हे सर्व सरकारच्या अव्यवस्थापनाचा परिणाम आहे. आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या देशात अनावश्यक खर्च केला गेला. गगनचुंबी इमारती आणि फिरणारे रेस्टॉरंट बनवले गेले. आता या इमारती रिकाम्या पडून आहेत. मागील वर्षी सरकारने जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रात्रीतून रासायनिक-कीटकनाशकांच्या आयातीवर बंदी आणली. याविरोधात शेतकऱ्यांनी शेत पडीक ठेवले. खाद्यान्न नसल्याने किमती आकाशाला भिडल्या. तथापि, हा निर्णय नंतर बदलावा लागला.

करात सूट दिल्याने संकट ओढवले
करात कपात :
नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकार स्थापनेनंतर राष्ट्रपती राजपक्षेंनी व्हॅट १५% हून घटवून ८% केल्याने दरवर्षी ६० हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. जगातील तीन सर्वोच्च संस्थांचे रेटिंग घटल्याने जागतिक भांडवल बाजारातून स्वस्त कर्ज मिळणे बंद झाले.

तिजोरी रिकामी: परकीय चलन साठ्यातून कर्ज फेडावे लागत आहे. देशात फक्त १२ हजार कोटी परकीय चलनसाठा आहे. २०१९ मध्ये तो ५७ हजार कोटी रु. होता.

कर्जाचा फास : जानेवारी २०२२ मध्ये गेल्या २५ महिन्यांत सरकारवरील कर्ज १७३% वाढले. चीनचेच ३८ हजार कोटींचे कर्ज आहे. ते फेडणे आणि आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी श्रीलंकेला महागडे डॉलर खरेदी करावे लागतेय.

कोरोनाचा मार : अर्थव्यवस्थेत १०% पर्यटनाचे योगदान होते. कोरोनामुळे ते ठप्प झाल्याने बेरोजगारीने कळस गाठला. यातून सावरण्यासाठी ३ लाख कोटी रु. चे नवे चलन छापले गेले. डॉलरचे दर २०० श्रीलंकन रुपये ठरवले गेले.

संधीचा लाभ : व्यापाऱ्यांनी बंदी नसलेल्या वस्तूंचीच आयात केली. काळ्या बाजारात डॉलर ४३० रुपयांचा झाला.

आयपीएल प्रक्षेपण बंद

पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे पेट्रोल पंपावर लष्कर तैनात केले.

तीन महिन्यांतच पेट्रोलचे दर ३० टक्क्यांपर्यंत वाढले.

डिझेल नसल्याने संपूर्ण देशात १३ तासांपेक्षा जास्त भारनियमन.

कागदाच्या तुटवड्याने परीक्षा रद्द. वृत्तपत्रांची छपाई बंद. आयपीएलचे थेट प्रक्षेपणही थांबवले गेले.

भारताने ४० हजार टन डिझेल व तांदूळ पाठवले
भारतातून श्रीलंकेत पोहोचलेल्या ४० हजार टन डिझेलचे वितरण सुरू झाले. ४० हजार टन तांदूळही पाठवला जातोय. दोन्ही देशांत १ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...