आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Largest Camp In Europe Was Set On Fire, Sheltering More Than Six Times The Capacity Of The Migrants.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनानंतर नवे संकट...:युरोपातील सर्वात मोठ्या छावणीला आग, या छावणीत क्षमतेच्या सहापट जास्त स्थलांतरितांना आश्रय देण्यात आला होता

मॅटिलेन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या घटनेत जीवितहानीचे वृत्त नाही. परंतु सतर्कतेमुळे लोकांचे प्राण वाचले

ग्रीसच्या लेस्बोस बेटावरील युरोपच्या सर्वात मोठ्या स्थलांतरितांची छावणी असलेल्या मोरियामध्ये बुधवारी भीषण आग लागली. या घटनेत जीवितहानीचे वृत्त नाही. परंतु सतर्कतेमुळे लोकांचे प्राण वाचले. परंतु संपूर्ण छावणी खाक झाली. मोरिया कॅम्पमधील दयनीय स्थितीकडे दोन दिवसांपूर्वी जर्मनीतील चार संघटनांनी लक्ष वेधले होते. संसदेच्या समोर १३०० रिकाम्या खुर्च्या ठेवून ते आंदोलन करण्यात आले होते. या छावणीत क्षमतेच्या सहापट जास्त स्थलांतरितांना आश्रय देण्यात आला होता. वास्तविक या छावणीत २२०० लोकांसाठी व्यवस्था आहे. वास्तविक सध्या या छावणीत १३ हजारांवर लोक राहतात, असे युनायटेड नेशन्स रेफ्युजी या संस्थेने म्हटले आहे. त्यात चार मुलेही आहेत. मोरिया वगळल्यास युरोपच्या इतर कोणत्याही छावणीत २ हजारांहून जास्त लोकांना राहण्याची व्यवस्था नाही.

आग लागल्यानंतर मोरिया छावणी अशी दिसत होती. येथे ७० देशांतून आलेले स्थलांतरित राहत होते. त्यापैकी बहुतांश ७० टक्के अफगाणिस्तानचे होते. २०१५ नंतर येथे स्थलांतरितांची संख्या वाढली होती.
आग लागल्यानंतर मोरिया छावणी अशी दिसत होती. येथे ७० देशांतून आलेले स्थलांतरित राहत होते. त्यापैकी बहुतांश ७० टक्के अफगाणिस्तानचे होते. २०१५ नंतर येथे स्थलांतरितांची संख्या वाढली होती.
आगीत मोरिया छावणी पूर्णपणे खाक झाली. स्थलांतरित लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने करत होते. त्यांच्या चुकीने छावणीने पेट घेतला. छावणीत कोरोनाचे ३५ रुग्ण आहेत.
आगीत मोरिया छावणी पूर्णपणे खाक झाली. स्थलांतरित लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने करत होते. त्यांच्या चुकीने छावणीने पेट घेतला. छावणीत कोरोनाचे ३५ रुग्ण आहेत.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser