आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हनोई:जगातील सर्वात मोठी गुहा 326 दिवसांनी उघडली; आत तलाव, नद्या व जंगलही

हनोईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील सर्वात मोठी गुहा 326 दिवसांनी उघडली

जगातील सर्वात मोठी गुहा ३२६ दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. सान डोंग नावाची ही गुहा व्हिएतनाममध्ये क्वांग-विन्ह प्रांतातील नॅशनल पार्कमध्ये आहे. ती जागतिक महामारीमुळे मार्च २०२० पासून बंद होती. ही गुहा ९ किमी लांब, २०० मीटर रुंद आणि १५० मीटर उंच आहे. त्यात न्यूयॉर्कसारख्या ४० मजली इमारती उभ्या राहू शकतात, असा दावा आहे. तिला व्हिएतनामची ग्रेट वॉलही म्हटले जाते. विशेष म्हणजे तिच्या आत लहान लहान १५० गुहा आहेत. तसेच ढग, तलाव, नद्या आणि जंगलही आहे. युनेस्कोनुसार ही गुफा ५० लाख वर्षे प्राचीन आहे. २०१३मध्ये ती पर्यटकांसाठी पहिल्यांदा खुली करण्यात आली होती. तेव्हा सुमारे २५० पर्यटकांना तेथे जाण्याची परवानगी मिळाली होती. या गुहेला १९९१ मध्ये स्थानिक आदिवासींनी शोधून काढले होते.

- गुहा उघडल्यानंतर पर्यटक येऊ लागले आहेत. गुहेत जाण्याआधी पर्यटकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना १० किमी पायी चालणे व ६ वेळा रॉक क्लायम्बिंग करावे लागेल. हे लोक गुहेत चार दिवस व तीन रात्री थांबतील. यादरम्यान या पर्यटकांकडून योगा व मेडिटेशनही करवून घेतले जाईल. गाइडनुसार एका पर्यटकाचे सुमारे दोन लाख रुपये तिकीट असेल.

- २००९मध्ये ब्रिटिश संशोधकांनी या गुहेवर संशोधन केले आणि तिला जगासमोर आणले. यानंतर युनेस्काने या नैसर्गिक गुहेचा त्यांच्या यादीत समावेश केला. आता ही गुहा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण झाले आहे. दरवर्षी येथे हजारो लोक येतात.