आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाशी लढाई:रशियामध्ये 20 दिवसांत उभारले सर्वात मोठे कोरोना रुग्णालय; अशी 18 रुग्णालये अजून बनत आहेत 

मॉस्को3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • रशियात एकूण बाधितांची संख्या १० हजारांहून जास्त
  • ३ दिवसांपासून सरासरी येताहेत १ हजार रुग्ण

वुहानच्या धर्तीवर रशियातही आणीबाणीचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. १० हजारांहून जास्त श्रमिकांनी हे रुग्णालय २० दिवसांत साकारले आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी ७०० कोटी रुपये खर्च आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी रशियातील एकूण १८ रुग्णालयांतील हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. उर्वरित रुग्णालये लष्कराने तयार केली. या रुग्णालयात निम्मे बेड आयसीयू व व्हेंटिलेटर सुविधायुुक्त असतील. 

सर्वात वाईट परिस्थिती येणे बाकी, पुतीन यांचा इशारा 

  • देशात सर्वात वाईट परिस्थिती येणे बाकी आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती पुतीन यांनी इशारा दिला आहे. तीन दिवसांत सरासरी १ हजार नवीन प्रकरणे आली आहेत.
  • मॉस्कोतील प्रमुख रुग्णालय व्हीव्हीआयपी लोकांनी फुल्ल झाले आहे. रशियात एकूण १० हजार १३१ बाधित असून ६९ टक्के मॉस्कोतील आहेत. ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...