आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Letter, Written By 83 Of The World's Richest People, Said He Wanted To Pay More Taxes To Cope With The Corona

कोरोना संकट:जगातील 83 श्रीमंतांनी लिहिले पत्र, म्हणाले- कोराेनाचा सामना करण्यासाठी जास्त कर द्यायची इच्छा

लंडन3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
न्यूझीलंडचे दुसरे श्रीमंत व्यक्ती स्टीफन टिंडालही जास्त कर देऊ इच्छितात. त्यांच्याकडे ३५३६ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
  • श्रीमंतांनी सांगितले, रुग्णालयात सेवा करणार नाही, मात्र मदतीस तयार

जगातील ८३ श्रीमंत लोकांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त कर भरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे लोक पॅट्रियॉट्रिक मिलेनियर्स, ऑक्सफॅम, ह्यूमन अॅक्ट, टॅक्स जस्टीस, क्लब ऑफ रोम रिसोर्स जस्टिस आणि ब्रिजिंग व्हेंचर संस्थांच्या माध्यमातून मदतीसाठी पुढे आले आहेत.

या संदर्भात ब्रिटन, न्यूझीलंड, इटली, आयर्लंड आणि इतर देशांच्या श्रीमंत लोकांनी आपल्या देशाच्या सरकारला पत्र लिहिले आहे. यात लवकरात लवकर कर आकारला जावा, असे नमूद केले आहे. हे कर मोठ्या प्रमाणात असले पाहिजेत. बहुतांश श्रीमंत म्हणाले, “आम्ही रुग्णालयात राहून रुग्णांची काळजी घेऊ शकत नाही, रुग्णवाहिका चालवून रुग्णालयात जाऊ शकत नाही, परंतु त्यांना मदत करू इच्छितो.” अशा परिस्थितीत अधिक कर भरणे हे मदतीचे महत्त्वपूर्ण साधन असू शकते. आघाडीवर राहून कोरोनाशी लढा देणाऱ्या लोकांप्रती आम्ही ऋणी आहोत. कोरोनामुळे झालेला आर्थिक परिणाम काही दशकांपर्यंत टिकेल. या परिस्थितीत, जगातील सुमारे ५० कोटी लोकांवर गरिबीचे सावट आहे. आम्हाला सर्वांना मदत करायची आहे. जी -२० देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरांच्या बैठकीपूर्वी या गटाने हे पत्र दिले. ही व्हर्च्युअल बैठक १८ जुलैला होईल. बैठकीचे आयोजन सौदी अरेबिया करेल. न्यूझीलंडमधील दुसरे श्रीमंत उद्योजक स्टीफन टिंडल, ब्रिटीश पटकथा लेखक आणि दिग्दर्शक रिचर्ड कर्टिस, आयरिश उद्योजक भांडवलदार जॉन आणि फॅरेल यांच्यासह या पत्रावर इतर धनाड्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.