आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत कमी शिकलेल्या लोकांच्या तुलनेत शिक्षित लोक १० वर्षे अधिक जगतात. म्हणजे २५ वर्षीय पदवीधर युवक हायस्कूलपर्यंत शिकून शिक्षण सोडणाऱ्या युवकाच्या तुलनेत अधिक जगतो. आजवर श्रीमंतांच्या तुलनेत गरीब लोक अल्पायुषी असतात, असे मानले जात होते. मात्र, संशोधनात असे आढळून आले आहे की, आयुर्मानाचा उत्पन्नाशी नव्हे शिक्षणाशी संबंध आहे.
अमेरिकेतील नॅशनल अकादमी ऑफ सायन्सच्या नियतकालिकात प्रिन्स्टन विद्यापीठाच्या प्रो. अॅनी केस आणि प्रो. एंगस डिटन यांनी आयुर्मानाच्या डाटाआधारे हे विश्लेषण केले आहे. १९९० ते २०१८ दरम्यानच्या ५ कोटी लोकांचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांनी अभ्यासले. लिंग, वंश किंवा जात याचा यात कुठेही संबंध नाही. संशोधकांनी स्पष्ट केले की, पदवीधर किंवा पदवी नसलेल्यांमधील हे अंतर १९९० आणि २०००च्या दशकात दिसू लागले. २०१० च्या दशकात आयुर्मानातील ही वाढ सुरू राहिली. तर, इतर अमेरिकींत ती संख्या घटत होती. जसजसे मृत्युदरात शैक्षणिक अंतर वाढले, वांशिक अंतर कमी होत गेले. १९९०पूर्वी श्वेत लोक कितीही कमी शिकलेले असले तरी कृष्णवर्णीयांच्या तुलनेत अधिक जगतात, असे मानले जात होते. मात्र, वास्तव वेगळे आहे. शिक्षित लोक निरोगी जीवनशैली विकसित करतात, तर कमी शिकलेले लोक धूम्रपान आणि नशेच्या आहारी जातात. त्यांना रोजगारातही निरोगी आरोग्याची हमी मिळू शकत नाही.
भारतात गेल्या १० वर्षांत सरासरी आयुर्मान वाढले आहे. मानव विकास अहवाल-२०२० नुसार, २०१९ मध्ये जन्मलेल्या भारतीयांचे आयुर्मान ६९.७ वर्षे नोंदले गेले. बांगलादेशमधील ७२.७ वर्षे तर पाकिस्तानमध्ये तेच ६७.३ वर्षे नोंदले गेले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.