आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Loss Of Their Future If Students Do Not Return To School, Johnson Warns; What Will The Government Do If The Infection Increases: Teachers Association

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:विद्यार्थी शाळेत न परतल्यास त्यांच्या भविष्याचे नुकसान, जॉन्सन यांचा इशारा; संसर्ग वाढला तर सरकार काय करेल : शिक्षक संघटना

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान जॉन्सन यांनी अपमिंस्टरमधील एका शाळेत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे
  • भारतात 1 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास 62% पालकांचा नकार
  • जगभरात शाळा पुन्हा उघडण्याची तयारी, कुठे समर्थन तर कुठे विरोध

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून सर्व शाळा उघडण्यात येतील. मुले शाळेत न आल्यास त्यांच्या भविष्याचे नुकसान होईल, असा इशारा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पालकांना दिला आहे. जॉन्सन म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेत सुरक्षा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आणि मित्रांच्या सोबतीसाठी त्यांना पुन्हा शाळेत पाठवणे गरजेचे आहे. सरकारने शास्त्रज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञांशी सल्लामसलत करून शाळा सुरू करण्याची मोहीम सुरू केली आहे. कोरोना संकटाच्या तुलनेत पूर्ण तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे, नॅशनल एज्युकेशन युनियनचे संयुक्त महासचिव केव्हिन कर्टनी यांनी सांगितले, पूर्णवेळ शाळा सुरू करण्याचे आम्ही समर्थन करत आहोत. मात्र शाळेत कोरोना पसरला तर काय कराल, हे मंत्र्यांनी स्पष्ट करावे. सरकारकडे प्लॅन बी आहे का? ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मार्चमध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यानंतर सरकारने जूनपासून शाळा उघडण्याचे आदेश दिले होते.

सरकारी अहवाल : जूनमध्ये १० हजार शाळा सुरू, एका ठिकाणी संसर्ग

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या संशोधनानुसार, जूनमध्ये उघडण्यात आलेल्या १० हजार शाळांपैकी केवळ एकाच शाळेत कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली. येथे ७० विद्यार्थी आणि १२८ कर्मचारी बाधित झाले होते. ब्रिटिश एज्युकेशनल सप्लायर्स असोसिएशननुसार, ब्रिटनमध्ये ३२७७० शाळा आहेत. ब्रिटनमध्ये एका स्थानिक मीडियाच्या सर्वेक्षणातही शाळा सुरू करणे आवडेल की पब, असे विचारण्यात आले होते. यावर ८०% लोकांनी शाळा सुरू करा व १३% लोकांनी पब सुरू करा असे सांगितले होते.

भारत : १ सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास ६२% पालकांचा नकार

भारतात केलेल्या सर्वेक्षणात ६२% पालकांनी १ सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे सांगितले. लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात २६१ जिल्ह्यांतील २५ हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. यानुसार २३% पालकांनी मुलांना शाळेत पाठवणार असल्याचे सांगितले. १५% पालकांनी उत्तर दिले नाही. तर ७७% लोकांनी सांगतिले, ते पुढील दोन महिन्यांपर्यंत चित्रपट पाहण्यासाठी मल्टिप्लेक्स किंवा थिएटरमध्ये जाणार नाहीत.