आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Loud Voice Of Women In Mexico; 'We Have To Suffer In Pregnancy, So Give Us The Right To Abortion'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन:मेक्सिकोमध्ये महिलांचा बुलंद आवाज; ‘गरोदरपणात आम्हाला कळा सोसाव्या लागतात, म्हणूनच गर्भपाताचाही अधिकार द्या’

मेक्सिको7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून साजरा केला जातो

जगातील अनेक देशांत नुकताच आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन साजरा झाला. यानिमित्ताने मेक्सिकोमध्ये हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. महिलांनी आपल्या मागणीसाठी निदर्शनेही केली. महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार मिळावा. गरोदरपणाच्या सगळ्या वेदना महिलांनाच सोसाव्या लागतात. त्यामुळेच गर्भ ठेवायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकारही महिलांनाच असला पाहिजे, अशी जाेरदार मागणी याप्रसंगी महिलांनी केली. निदर्शनांदरम्यान महिलांनी लोखंडी रॉड व हातोड्यांनी हल्ला केल्याचा दावा मेक्सिकोच्या पोलिसांनी केला आहे. २८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून साजरा केला जातो. स्वत:च्या शरीरावर स्वत:चा अधिकार आहे, हे यानिमित्ताने महिला आंदोलकांनी निक्षून सांगण्याचाही प्रयत्न केला.

हा दिवस पहिल्यांदा अमेरिका व कॅरेबियन देशांत २८ सप्टेंबर १९९० रोजी गर्भपात निर्मूलनासाठी कारवाईचा दिवस अशा रूपात साजरा झाला होता. परंतु २०१५ मध्ये त्यास आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन असे संबोधले गेले. तेव्हा ४७ देशांत मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर २०१६ मध्ये जगभरात निदर्शने झाली होती.

बातम्या आणखी आहेत...