• Home
  • International
  • The magnetic field in the south America and Africa is weak; Satellite mobiles can be damaged, affecting aircraft as well

दिव्य मराठी विशेष / आफ्रिका आणि द. अमेरिकेमधील चुंबकीय क्षेत्र कमकुवत; उपग्रहे-मोबाइल खराब होऊ शकतात, विमानांवरही परिणाम

  • 200 वर्षांत 9% कमी झाली पृथ्वीची चुंबकीय शक्ती : अंतराळ संस्थेचा खुलासा
  • पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमुळेच आपला रेडिएशनपासून बचाव

वृत्तसंस्था

May 23,2020 07:29:00 AM IST

लंडन. जगासमोर आता आणखी एक गंभीर संकट उभे राहिले आहे. युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमधील एक मोठ्या क्षेत्रात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सातत्याने कमकुवत होत असल्याचा खुलासा केला आहे. यामुळे या भागांमध्ये पृथ्वीवरील उपग्रह बिघडल्याने मोबाइल खराब होऊ शकतात. तसेच विमानातून प्रवास करणे कठीण होऊ शकते. पृथ्वीवर जगण्यासाठी चुंबकीय क्षेत्र अत्यावश्यक आहे. यामुळे पृथ्वीचा अंतराळातून होणाऱ्या रेडिएशनपासून बचाव होतो. शास्त्रज्ञांनुसार, पृथ्वीच्या ध्रुवांमध्ये बदल होत आहेत. यामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव एकमेकांचे स्थान घेतात. असे ७,८०,००० वर्षांपूर्वी घडले होते. अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या स्वार्म उपग्रहाच्या मदतीने याबाबतचा डेटा जमा केला आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला तयार करणाऱ्या चुंबकीय लहरी ओळखण्यासाठी आणि मोजण्यासाठी तयार केले आहेत. आफ्रिका ते दक्षिण अमेरिकेपर्यंत सुमारे १० हजार किमी अंतरावर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची शक्ती कमी झाली असल्याचे सखोल अभ्यासातून समोर आले. साधारणत: ही चुंबकीय शक्ती ३२ हजार नॅनोटेस्ला असायला हवी. मात्र १९७० पासून २०२० पर्यंत ही २२ हजार नॅनोटेस्लावर घसरली आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले, मागील २०० वर्षांत पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमध्ये ९ टक्के घट झाली आहे. ही होत असलेली घट धोकादायक ठरू शकते. जर्मन संशोधक जुरगेन मत्जकांनी सांगितले, ही प्रक्रिया समजून घेण्याचे सध्या मोठे आव्हान आहे. पृथ्वीच्या केंद्रात होणाऱ्या बदलांमुळे किती मोठा फरक पडेल हे बघावे लागेल. साधारणत: पृथ्वीची चुंबकीय शक्ती २.५० लाख वर्षांत बदलते. सध्या यासाठी भरपूर वर्षे बाकी आहेत.

पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमुळेच आपला रेडिएशनपासून बचाव

चंुबकीय क्षेत्र कशा प्रकारे तयार होते ते अशा प्रकारे समजून घेता येईल. पृथ्वीच्या गाभ्यात गरम लोहाचा समुद्र आहे. हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३००० किमी खाली असतो. हा फिरत असतो. याच्या फिरण्यामुळे पृथ्वीच्या आत विद्युत प्रवाह तयार होतोे. वर येताना इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्डमध्ये याचे रूपांतर होते. पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमुळेच आपला अंतराळातून येणाऱ्या रेडिएशनपासून बचाव होतो.

X