आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई हल्ल्याचा मुख्य आराेपी लष्कर-ए-ताेयबाचा म्हाेरक्या झकीउर रहेमान लखवीला पाकिस्तान सरकार दरमहिन्याला दीड लाख रुपये देणार आहे. इम्रान खान सरकारच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित समितीने मंजुरी दिली आहे. २००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लखवीचा हात असल्याचे समाेर आले हाेते.
परिषदेने त्याला निर्बंध असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले हाेते. या अहवालानुसार लखवीला दरमहिन्याला भाेजन खर्चापाेटी ५० हजार रुपये, आैषधी-४५ हजार, वकिलाची फीस व इतर खर्च प्रत्येकी २० हजार रुपये आहेत. प्रवासासाठी १५ हजार रुपये दिले जातील.
मुंबई हल्ल्यातील आराेपी व तुरुंगात कैद असलेल्या झकीउर रहेमानला पाकिस्तान सरकारने एप्रिल २०१५ मध्ये मुक्त केले हाेते. तेव्हा पाकिस्तानने लखवीच्या विराेधात ठाेस पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला हाेता. रावळपिंडीच्या अडीयाला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लखवी अनेक दिवस अंडरग्राउंड हाेता. परंतु दहशतवादी कारवाया सुरूच ठेवल्या हाेत्या. लखवी जमात-उद दावाचा म्हाेरक्या हाफिज सईदचा ताे साथीदार हाेता. संघटनेत ताे दुसऱ्या क्रमांकावर हाेता. मुंबई हल्ल्यात पकडलेला अजमल कसाब, डेव्हिड हेडली व अबू जुंदाल यांनी चाैकशीदरम्यान लखवीच्या नावाचा उल्लेख हाेता. ताे हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांच्या संपर्कात हाेताे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.