आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावजन घटवण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग (निश्चित केलेल्या अवधीनंतर खाणे) सध्या ट्रेंडमध्ये आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी, रीस वेदरस्पून आणि जेनिफर एनिस्टन यांसारख्यांनी त्याचे समर्थन केले आहे. पण ब्रिटनमध्ये झालेल्या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, इंटरमिटंट फास्टिंगमध्ये जेव्हा दीर्घ अवधीनंतर आपण जेवण करतो तेव्हा ही पद्धत वेगाने वजन घटवण्यासाठी परिणामकारक नाही. तिला ‘जादूची गोळी’ (मॅजिक पिल) मानण्याची चूक करू नका. ब्रिटनच्या बाथ विद्यापीठाच्या अभ्यासादरम्यान इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्यांचे वजन फार घटले नाही, तर पारंपरिक आहार घेणाऱ्यांचे वजन कमी झाल्याचे आढळले.
अभ्यासाचे नेतृत्व करणारे आणि विद्यापीठातील सेंटर फॉर न्यूट्रिशन, एक्झरसाइज अँड मेटॅबॉलिझमचे प्रमुख प्रा. जेम्स बेट्स म्हणाले की, ज्यांना वेगाने वजन घटवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पारंपरिक आहार हा चांगला पर्याय आहे. अशा प्रकारच्या आहारात निश्चित अवधीत कॅलरीचे प्रमाण सतत मर्यादित करण्याचा समावेश आहे. ५ : २ इंटरमिटंट फास्टिंगमध्ये आठवड्यात पाच दिवस कॅलरीची चिंता न करता खातात, तर दोन दिवस ५००-६०० कॅलरी घ्याव्या लागतात. १६ : ८ आहारात दिवसातील १६ तास उपाशी राहावे लागते, फक्त ८ तासांचा वेळ खाण्यासाठी असतो.
प्रा. बेट्स यांच्या मते, अनेक तास उपवास ठेवून नंतर खाल्ल्यास मांसपेशी आणि शारीरिक हालचालींचा स्तर कायम राखण्यास समस्या होऊ शकते. अभ्यासादरम्यान पहिल्या गटाला एक दिवसाआड उपवास ठेवण्यास सांगण्यात आले, दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या सामान्य आहारापेक्षा ५०% जास्त जेवण देण्यात आले. दुसऱ्या गटाला फक्त पारंपरिक आहार देण्यात आला. त्यात कॅलरीचे प्रमाण २५% पर्यंत कमी ठेवण्यात आले. तिसऱ्या गटाला पहिल्या गटाप्रमाणेच एक दिवसाआड उपाशी राहायचे होते, पण दुसऱ्या दिवशी १००% जास्त जेवण देण्यात आले. तीन आठवड्यांनंतरचे निकाल आश्चर्यजनक होते. पहिल्या गटाचे वजन १.६ किलोने घटले, तर दुसऱ्याचे (पारंपरिक आहार) वजन सुमारे २ किलोपर्यंत कमी झाले. तिसऱ्या गटाच्या वजनात फार फरक दिसला नाही.
पारंपरिक आहारात कॅलरी कमी ठेवण्याकडे लक्ष दिले जाते : तज्ज्ञ
इंटरमिटंट फास्टिंगदरम्यान जास्त फायबरच्या आहारात ड्रायफ्रूट, शेंगा, भाज्या तर उच्च प्रोटीनच्या जेवणात मासे, मांस, टोफू आणि पाणी जास्त असते. भारतातील प्रख्यात डाएटिशियननुसार, पारंपरिक खाण्यात नाष्ट्यात इडली, पोहे, उपमा, तर दुपारच्या जेवणात ताज्या भाज्यांचे सॅलड, दही, डाळ पालक किंवा सांबार, रसम, बहुविध धान्याची पोळी आणि भात यांचा समावेश असतो. रात्रीच्या जेवणात ताज्या भाज्या, मेथी डाळ, सांबार किंवा रसम, पोळी आणि ताक घेण्याचा सल्ला दिला जातो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.