आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन तरुणांचे युरोपात पलायन:क्राइम-गन कल्चरचा फटका, वर्षभरात युरोपियन देशांतील त्यांचा आकडा 45% पर्यंत वाढला

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील लाखो लोक अमेरिकन ड्रीम्सचे स्वप्न पाहतात. पण स्वतः अमेरिकन तरुणांना युरोपियन देशांचे वेध लागले आहे. हा नवा ट्रेंड आहे. सध्या अमेरिकेत सेवानिवृत्त झालेले अनेकजण इटली, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीस व फ्रान्स सारख्या युरोपियन देशांत स्थायिक होत आहेत. या देशांतील त्यांची संख्या आता 45 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यामुळे इटलीतील अनेक कंपन्यांचे उत्पन्नही वाढले आहे.

पलायनाचे मुख्य कारण डॉलर मजबूत होण्याचे आहे. अमेरिकेत महागडे उपचार, गन कल्चरमुळे गुन्हेगारी वाढली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे अमेरिकन नागरिक दुसऱ्या देशांत स्थायिक होऊन कमी पैशात आलिशान जीवन जगण्यास भर देत आहेत. कॅलिफोर्नियाच्या जेन विटमॅन पती व मुलांसह पोर्तुगालमध्ये राहत आहेत. त्यांना आपल्या मुलांचे वेगळ्या वातावरणात संगोपन करावयाचे आहे. एक असे वातावरण, जिथे शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ येऊ नये व आरोग्याच्या सुविधाही मोफत मिळाव्यात.

4 कोटींहून अधिक जणांनी नोकरी सोडली

कोरोना काळात कामगार वर्गाला आपण खासगी व व्यावसायिक आयुष्यात अंतर करत नसल्याचे जाणवले. यामुळे अमेरिकेत 2021 मध्ये 4 कोटींहून अधिक जणांनी नोकरी सोडली. या काळात नागरिकांनी महागड्या उपचारांमुळे रुग्णालयात जाणेही टाळले. नियमित तपासणीकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे आता चांगले जीवन जगण्यासाठी त्यांचे पाय युरोपियन देशांकडे वळत आहेत. 2020 मध्ये अमेरिकेतील हत्यांचा आकडाही 30 टक्क्यांपर्यंत वाढला होता.

गन कल्चर सर्वात मोठी समस्या

एका सर्वेनुसार, अमेरिकन नागरिकांच्या मते महागाईनंतर गन कल्चर ही सर्वात मोठी समस्या आहे. याऊलट युरोपियन देशांत गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. कल्याणकारी योजना खूप आहेत. घरेही कमी किंमतीत मिळतात. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये राहणाऱ्या डान्सर के.सी.रोज यानी 2020 मध्ये जीवनशैली बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना न्यूयॉर्क सिटीच्या थिएटर ग्रुपने काढून टाकले होते. 2021 च्या प्रारंभी त्या फ्लोरेन्सला गेल्या. आता त्या तिथे आरामात राहत आहेत. त्यांना आरोग्य सुविधाही मोफत मिळत आहेत.

अमेरिकन कंपन्यांत वेतन जास्त, वर्क फ्रॉम होम सुरू

युरोपात राहून अमेरिकन कंपन्यांसाठी रिमोट वर्क करणाऱ्यांचा आकडाही खूप मोठा आहे. युरोपियन देशांत 27 हजार ते 45 हजार डॉलर्सपर्यंत वेतन मिळते. याऊलट अमेरिकन कंपन्या सरासरी 70 हजार डॉलर्सचे वेतन देतात. त्यामुळे नागरिकांची मोठ्या वेतनाची इच्छा नसते. अमेरिकन कंपन्यांत काम करून युरोपियन खर्च केला तर आपली परचेसिंग पॉवर मजबूत राहील असे त्यांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...