आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Where Does The Money To Be Spent On The Queen Of Britain Come From? How Much Wealth Did Queen Elizabeth Leave Behind? Who Will Get All The Wealth?

ब्रिटनच्या महाराणीवर खर्च होणारा पैसा येतो कुठून?:किती संपत्ती सोडून गेल्या राणी एलिझाबेथ? सर्व धनदौलत कुणाला मिळणार?वाचा हा रिपोर्ट

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या राजघराण्याला करदात्यांकडून मोठी रक्कम प्राप्त होते. त्याला सार्वभौम अनुदान म्हणतात. 15 सार्वभौम राष्ट्राची राणी राहीलेली एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्यामागे अब्जावधींती संपत्ती सोडली, ती वारसाहक्काने त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांना मिळेल. पण राजघराण्यावर आणि ब्रिटनच्या राणीवर होणारा खर्च कुठून येतो. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ही सर्व संपत्तीचा वारसदार कोण असेल याचा आढावा या रिपोर्टमधून 'दिव्य मराठी'ने घेतला आहे.

पंचवीसाव्या वर्षी राणी

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी स्काॅटलॅंच्या बाल्मोरल कॅसलमध्ये निधन झाले. त्यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी ब्रिटनच्या राणी झाल्या. सत्तर वर्षांपर्यंत त्या या पदावर राहील्या. 15 स्टेटच्या राणी एलिझाबेथ आपल्यामागे अब्जावधींची संपत्ती सोडून गेल्या. ही संपत्ती आता त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांना वारसाहक्काने मिळेल. परंतु, राजघराण्यांचा खर्च आणि त्यांची स्थावर संपत्ती बकिंगहम पॅलेस आणि द क्राऊन इस्टेटसारख्या इमारतीतच्या देखभालीसाठी पैसा कुठून येतो? राणीच्या विदेश दौऱ्यातील खर्च कोण उचलतो? याची उत्तरे खाली आहेत.

किती आहे राणीची वैयक्तिक संपत्ती

फोर्ब्जनूसार, राणी एलिझाबेथ या आपल्या मागे 500 मिलियन डॉलर एवढी संपत्ती सोडून गेल्या आहेत. ही संपत्ती प्रिन्स चार्ल्स यांना ब्रिटनचे महाराजा बनल्यानंतर वारसा हक्काने मिळणार आहे. ब्रिटनच्या राजघराण्याला करदात्यांकडून मोठी रक्कम प्राप्त होते. त्याला सार्वभौम अनुदान म्हणतात. हा पैसा सरकारी तिजोरीतून दिला जातो.

सार्वभौम अनुदान म्हणजे काय?

हा एक सर्वसाधारण करार आहे. राजघराण्याला क्राऊन इस्टेटकडून सर्व नफा दिल्यानंतर त्या बदल्यात अनुदान मिळते. प्रत्येक वर्षी राजघराण्याला ग्राउंड इस्टेटच्या नफ्याच्या 25 टक्के रक्कम स्वरूपात दिली जाते. 2021 आणि 2022 मध्ये सार्वभौम अनुदानाची रक्कम 86 मिलियनपेक्षाही अधिक निश्चित झाली होती. याशिवाय ब्रिटनच्या राजघराण्याला काही अन्य ठिकाणावरूनही मिळकत प्राप्त होते

डची ऑफ लँकेस्टरमधून मिळते जास्त नफा

ब्रिटिश राजघराण्याच्या उत्पन्नाचा काही भाग डची ऑफ लँकेस्टरमधून येतो. याला खाजगी पर्समधून मिळणारे उत्पन्नही म्हणता येईल. डची ऑफ लँकेस्टर हे राजघराण्यातील मालमत्तांची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक स्थूलपणे कृषी, व्यावसायिक आणि निवासी अशी विभागलेली आहे. यामध्ये डचीच्या काही ऐतिहासिक फोरशोअर आणि खनिज अधिकारांचा समावेश आहे. ही मालमत्ता ट्रस्टच्या नावावर आहे आणि त्याचा मुख्य उद्देश महाराजांना वैयक्तिक उत्पन्न मिळवून देणे हा आहे.

किती आहे उत्पन्न?

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, 2019 मध्ये डची ऑफ लँकेस्टरने राजघराण्याला $27 दशलक्ष कमावले. राजघराण्याच्या वेबसाइटनुसार, ही रक्कम सार्वभौम द्वारे समाविष्ट नसलेल्या खर्चासाठी वापरली जाते.

राणीचा मोठा मुलगा झाला सम्राट

राणीचा मोठा मुलगा किंग चार्ल्स हे ब्रिटनचे नवे राजे झाले आहेत. किंग चार्ल्सचा विवाह लेडी डायना स्पेन्सरशी झाला. दोघांना विल्यम आणि हॅरी अशी दोन मुलं आहेत. किंग चार्ल्स आणि डायना स्पेन्सर 1996 मध्ये वेगळे झाले. डायना स्पेन्सर यांचे 1997 मध्ये पॅरिसमध्ये कार अपघातात निधन झाले होते.

कुणाला मिळणार राणीची संपत्ती?

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी (08 सप्टेंबर) स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे निधन झाले. त्यांचे वडील जॉर्ज सहावे यांचे निधन झाले, त्यानंतर एलिझाबेथ या 1952 मध्ये ब्रिटनच्या वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राणी बनल्या. त्यांच्या डोक्यावर राज्याभिषेकचा मुकूट घालण्यात आला होता. त्या जगातील एकमेव महिला होत्या ज्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नव्हती. सध्या 15 सार्वभौम राष्ट्रांच्या राणी एलिझाबेथ यांची अब्जावधींची संपत्ती मागे ठेवली आहे.

किती आहे एलिझाबेथ राणीची संपत्ती

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निव्वळ संपत्तीबाबत वेगवेगळ्या अहवालांमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. फॉर्च्यूनच्या मते, राणी एलिझाबेथने 500 दशलक्ष (रु. 39,858,975,000) संपत्ती मागे ठेवली आहे. प्रिन्स चार्ल्स राजा झाल्यावर ही मालमत्ता वारसाहक्काने त्यांना मिळेल.

किती होती एलिझाबेथ राणीची संपत्ती

ब्रिटनच्या राजघराण्याला करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असे, ज्याला सार्वभौम अनुदान म्हणून ओळखले जाते. हे राजघराण्याला वार्षिक आधारावर दिले जाते. प्रत्यक्षात. राजा जॉर्ज तिसरा याच्या काळात हे अनुदान सुरू झाले. त्यांनी संसदेत एक करार केला होता. अशा प्रकारे त्यांनी स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी निधी सुरक्षित करण्याचा मार्ग निवडला. हा करार, मूळत: नागरी सूची म्हणून ओळखला जातो, 2012 मध्ये सार्वभौम अनुदानाने बदलण्यात आला.

2021 आणि 2022 मध्ये, सार्वभौम अनुदानाची रक्कम 86 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त निश्चित करण्यात आली होती. हे निधी अधिकृत प्रवासाच्या खर्चासाठी, मालमत्तेची देखभाल आणि राणीच्या घराच्या - बकिंगहॅम पॅलेसच्या देखभालीसाठी वाटप केली जाते.

राजघराण्याची स्थावर संपत्ती

फोर्ब्सच्या मते, 2021 पर्यंत राजघराण्याकडे सुमारे 28 अब्ज डॉलर्सची एवढी होती, जी विकली जाऊ शकत नाही.

  • क्राउन इस्टेट: 19.5 अब्ज डाॅलर्स
  • बकिंगहॅम पॅलेस: 4.9 अब्ज डाॅलर्स
  • द डची ऑफ कॉर्नवॉल: 1.3 अब्ज डाॅलर्स
  • द डची ऑफ लँकेस्टर: 748 दशलक्ष डाॅलर्स
  • केन्सिंग्टन पॅलेस: 630 दशलक्ष डॉलर्स
  • स्कॉटलंडची क्राउन इस्टेट: 592 दशलक्ष डाॅलर्स

कुणाला मिळणार एलिझाबेथ राणीची संपत्ती?

बिझनेस इनसाइडरच्या मते, राणीने त्यांची गुंतवणूक, कला संग्रह, दागिने आणि रिअल इस्टेट होल्डिंग्समधून 500 दशलक्ष डाॅलर्सपेक्षा जास्त वैयक्तिक संपत्ती कमावली. यामध्ये सँडरिंगहॅम हाऊस आणि बालमोरल कॅसलचा समावेश आहे. त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचा बराचसा हिस्सा प्रिन्स चार्ल्स कडे सोपावला जाईल.

मोठा मुलगा चार्ल्सकडे राणींचे सिंहासन

राणी एलिझाबेथ गेल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा चार्ल्स ब्रिटनचे राजे झाले आहेत. 73 वर्षीय चार्ल्स हे ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या 15 देशांचे प्रमुखही बनले आहेत. राजघराण्याच्या नियमांनुसार, एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर चार्ल्स यांना कारभाराची सूत्रे हाती घ्यायची होती. नियमांनुसार, एलिझाबेथच्या मृत्यूनंतर लवकरच चार्ल्सला नवीन राजा घोषित केले जाते. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये, ज्येष्ठ संसद सदस्य, नागरी सेवक, महापौर, चार्ल्स यांना औपचारिकपणे राजा बनवतील.

बातम्या आणखी आहेत...