आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Mother Lamented The Inability To Do Business Online, While The Son Set Up An E commerce Company Worth Rs 12 Lakh Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:व्यवसाय ऑनलाइन करू न शकल्याची आईला हाेती खंत, तर मुलाने उभारली 12.5 हजार काेटींची ई-काॅमर्स कंपनी; फाेर्ब्जच्या यादीत समावेश

मिन जेओंग ली/अयाका मकी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आईच्या गाेष्टीचे स्वीकारले आव्हान, जपानच्या युताने 12 लाख लहान व्यावसायिक जाेडले

एक चांगली कल्पना आयुष्य बदलू शकते. असेच काहीसे जपानच्या युता सुरूओकाबाबत घडले. त्याच्या आईची एक गोष्ट त्याच्यासाठी आव्हान ठरली आणि त्याने १.७ अब्ज डॉलरची (अंदाजे १२,५८० काेटी रु) कंपनी उभारली.

युताची आई जपानच्या ग्रामीण भागात एक लहानसे दुकान चालवत हाेती. हा व्यवसाय ऑनलाइन करण्याची तिची इच्छा हाेती, परंतु त्याबाबत त्यांना काही माहिती नव्हती. जर इंटरनेटची माहिती असती तर मी ताे ऑनलाइन केला असता, अशी खंत त्यांनी युताकडे व्यक्त केली. ३० वर्षांचा युता म्हणाला की, इंटरनेटचे काैशल्य माहीत नाही तसेच तुटपुंज्या पैशामुळे व्यवसायाची कल्पना पण करू शकणार नाही अशा जगात आम्ही हाेताे. २०१२ मध्ये युता एका क्राऊड फंडिंग स्टार्टअपमध्ये इंटर्न करत हाेता. त्याच वेळी त्याने लहान व्यावसायिकांना ऑनलाइन मंचावर आणण्यासाठी साॅफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने ‘बेस’ या नावाने आपली कंपनी स्थापन केली. ज्याचे बाजारमूल्य अंदाजे १.७ अब्ज डाॅलरवर गेले आहे.

युता आता अब्जाेपती झाला आहे. त्याची कंपनी लाेकांना स्वत:चे ऑनलाइन दुकान सुरू करण्यासाठी मदत करते. याशिवाय त्यांनी एक शॉपिंग अॅपही तयार केला असून त्याचे ७० लाख युजर आहेत. बाजार विश्लेषक ओषिधि कुमारसिरी म्हणाले ‘बेस’ प्लॅटफाॅर्म युजर लक्षात घेऊन तयार केला असून त्याद्वारे काही तासांतच व्यवसाय ऑनलाइन करता येताे. वेबसाइट तयार करण्यासाठी युजर्सकडून शुल्क आकारले जात नाही, पण साइटसाठी तयार करण्यात आलेल्या पेमेंट टूल्सच्या माध्यमातून हाेणाऱ्या व्यवहार शुल्काद्वारे कमाई करतात. युता म्हणाला की, हाैस म्हणून मी बेस सुरू केली पण लाेकांनी त्यास महत्त्व देण्यास सुरुवात केल्याने त्याचे कंपनीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. लाेकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा देण्याची आमची इच्छा हाेती आणि ते करण्यात आम्हाला यश आले.

या यशामुळे युताचा समावेश झाला फाेर्ब्जच्या यादीत

ई-प्लॅटफार्मच्या यशामुळे युताचा फाेर्ब्जच्या ३० वर्षाखालील ३० यादीतही समावेश झाला. या वर्षी काेराेनामुळे त्याच्या कंपनीला चांगला व्यवसाय मिळाला. ऑगस्ट २०१९ पर्यंत त्याच्या फ्लॅटफाॅर्मवर ८ लाख कंपन्यांची नाेंदणी झाली हाेती. सप्टेंबरपर्यंत ती वाढून १२ लाखांवर गेली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser