आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:बर्फ वितळल्याने यंदा पर्वत बेरंग..

बर्लिन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र जर्मनीतील सर्वात उंच पर्वत जुगस्पिट्जचे आहे. हा पर्वत आॅस्ट्रिया सीमेवर आहे. ९ हजार ७१८ फूट उंच पर्वतावर एरवी वर्षभर बर्फाची चादर दिसत हाेती. त्याचे शुभ्र साैंदर्य अनुभवण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दीही येथे हाेत हाेती. परंतु यंदा पर्यटक नेहमीप्रमाणे या परिसरात दाखल झाले. तेव्हा त्यांच्या डाेळ्यासमाेर असलेला पर्वत त्यांची निराशा करणारा ठरला. युराेपात यंदा भीषण उष्णता जाणवली. त्याचा परिणाम जर्मनीतही दिसून आला. या उष्णतेमुळे पर्वतावरील बर्फ झपाट्याने वितळला. प्रत्येक मिनिटाला बर्फाचे किमान ५०० लिटर पाणी हाेत हाेते. म्हणजेच दाेन टब एवढे तुडुंब पाणी. आता या भागात बर्फ नसून डाेंगराळ रस्ते तसेच कडे-कपारी दिसू लागल्या आहेत. बर्फ वितळण्याचा वेग दाेन वर्षांत तीनपट झाला आहे. जर्मनीतील प्रसिद्ध एलमाऊ रिसाॅर्ट याच भागात आहे. जी-७ देशांच्या नेत्यांची बैठक येथेच झाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...