आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Mozart And Wagner Group, Which Entered The Battlefield To Help Ukraine, Were Accused Of Drinking And Embezzlement

रशिया-युक्रेन युद्ध:युक्रेनच्या मदतीसाठी युद्धाच्या मैदानात उतरलेल्या मोझार्ट अन् वॅगनर ग्रुपवर मद्यपान, घोटाळ्याचा आरोप

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनी सैनिकांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या अमेरिकी वॅगनर ग्रुप मोझार्ट समूहावर वित्तीय अनियमितता आणि मद्य पिऊन चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात अमेरिकेचे माजी मरीन अँड्र्यू मिलबर्न आणि जिन यांच्यावर कंपनीचा निधी वळवणे आणि जास्त नशेत युक्रेेनविरुद्ध अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप आहेत.

मिलबर्न यांनी सांगितले की, युक्रेनवरील टिप्पणीदरम्यान ते नशेत होते. त्यांनी वित्तीय अनियमिततेसंदर्भातील आरोप निराधार ठरवले. न्यूयॉर्क टाइम्सला त्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात युक्रेनी सैन्य युनिट्ना मोझार्टला प्रशिक्षण देण्यास सांगितले होते. मात्र, युक्रेनीयने याचे पेमेंट करू शकले नाही. मोझार्टला फंड उपलब्ध करणाऱ्या एका छोट्या घटकावर विसंबून ठेवण्यात आले. त्यात ज्यू-युक्रेनी वंशाच्या ईस्ट कोस्ट फायनान्सर्सचा एक समूह आणि एक टेक्सास टायकून सहभागी हाेते. त्यांनी अन्य लोकांप्रमाणे सांगितले की, अशा पद्धतीच्या संघटनांना एका व्यवसायाप्रमाणे चालवाव्या लागतात. आम्ही तसे केले नाही. शेकडो नव्हे तर हजारो विदेशी दिग्गज आणि स्वयंसेवक युक्रेनवरून गेले आहेत. त्यापैकी अनेक नशेखोर होते. मोझार्ट समूहाने सर्वात प्रथम युक्रेनी सैनिकांना प्रशिक्षण दिले. नागरिकांना वाचवले आणि ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा जमा केला. मात्र, यानंतर पैसा संपू लागला.

सप्टेंबरपासून फंड संपला, नोव्हेंबरमध्ये स्थिती बिघडली मोझार्टला सप्टेंबरपासून निधी मिळणे बंद झाले. तेव्हा अलाइड एक्सट्रॅक्ट चॅरिटी ग्रुपने कमी खर्चावर नागरिकांना वाचवण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरपर्यंत मोझार्टकडे रोकड कमी होती. खर्च भागवणे कठिण झाले होते.

बातम्या आणखी आहेत...