आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:दीर्घायू डेटलिंग गावाचे गूढ उकलले; व्यग्र राहा, मस्त राहा, महिलांचे सरासरी वय 95, पुरुषांचे 86 वर्षे

लंडन5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये डेटलिंग गावाबद्दल नेहमीच औत्सुक्य राहिले आहे. कारण तेथील नागरिक दीर्घायू आहेत. महिलांचे सरासरी वय ९५ तर पुरुषांचे ८६ वर्षे आहे. आठशे लाेकसंख्या असलेल्या गावाच्या दीर्घायू असण्याचे गूढ आता उकलले आहे. व्यग्र राहा, मस्त राहा असा येथील गावकऱ्यांचा मंत्र आहे. शेती तसेच इतर घरगुती कामांत शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे, असे गावातील लाेक सांगतात. त्याचबराेबर गावात धूम्रपानास बंदी आहे. २००२ मध्येच धूम्रपानावर बंदी घातली हाेती. वास्तविक ब्रिटनमध्ये इनडाेअर स्माेकिंगवर २००७ मध्ये बंदी लागू करण्यात आली हाेती. डेटलिंग गावात लाेकांचे सरासरी वय ब्रिटनमध्ये सर्वाधिक आहे.

हा संपूर्ण देशाच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय आहे. या डाेंगराळ गावाचे खनिज हेच या लाेकांच्या जास्त वयाचे रहस्य असावे, असे काहींना वाटते. डेटलिंगपासून जवळ असलेल्या ब्लूफील्डमधील लाेकांचे सरासरी वय अतिशय कमी आहे. ब्लूफील्डमध्ये महिलांचे वय ७३ तर पुरुषांचे ६७ वर्षे आहे.

डेटलिंगच्या आयव्ही व्हाॅटसन यांनी अलीकडेच १०० वा जन्मदिन साजरा केला. त्या म्हणाल्या, काेराेनाकाळात लाेकांनी परस्परांना खूप सहकार्य केले. एखाद्या घरात कुणी आजारी असल्यास त्याला गावातील लाेकांनी खूप मदत केली. त्यांना एकटे पडू दिले नाही.

बातम्या आणखी आहेत...