आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार्ल्स-III ब्रिटनचे नवे राजे:वयाच्या 73 व्या वर्षी सांभाळली जबाबदारी, 1969 मध्ये चार्ल्स यांनी घातला होता प्रिंस ऑफ वेल्सचा मुकुट

लंडन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग चार्ल्स-तृतीय अधिकृतपणे ब्रिटनचे नवे राजे बनलेत. शनिवारी सेंट जेम्स पॅलेसमध्ये प्रिव्ही काउंसिलच्या बैठकीत याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आता त्यांना किंग चार्ल्स-III म्हणून ओळखण्यात येईल. चार्ल्स यांना 'ड्यूक ऑफ कॉर्नवाल' ही उपाधी आपल्या वडिलांकडून वारशात मिळाली आहे. त्यामुळे त्यांची पत्नी कॅमिला यांना यापुढे 'डचेस ऑफ कॉर्नवाल' म्हणून ओळखण्यात येईल.

प्रिव्ही काउंसिलमध्ये वरिष्ठ खासदार, सीनिअर सिव्हिल सर्व्हंट्स, कॉमनवेल्थ उच्चायुक्त व लंडनचे लॉर्ड मेयर यांचा समावेश असतो. सामान्यतः या कार्यक्रमात 700 हून अधिक जण सहभागी होतात. पण यावेळी हा कार्यक्रम अत्यंत शॉर्ट नोटीसीवर आयोजित करण्यात आल्यामुळे त्यात अत्यंत निवडक लोकांचा समावेश होता.

यावेळी किंग चार्ल्स म्हणाले - माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबादारी पार पडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
यावेळी किंग चार्ल्स म्हणाले - माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबादारी पार पडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

नव्या राजाची ठळख वैशिष्ट्ये सांगण्यात आली

या कार्यक्रमात सर्वप्रथम प्रिव्ही काउंसिलचे लॉर्ड प्रेसिडेंट पेनी मोर्डंट यांनी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची घोषणा केली. ही घोषणा उंच आवाजात करण्यात आली. त्यानंतर अनेक प्रार्थना झाल्या. त्यात महाराणीच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आला. तसेच नव्या राजाची ठळक वैशिष्ट्येही सांगण्यात आली.

जाहिरनाम्यावर पंतप्रधान, कँटरबरीचे आर्कबिशप व लॉर्ड चँसलरसह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या कार्यक्रमात नव्या राजांनी सत्ता सांभाळल्यानंतर कोणते बदल केले जातील, हे ही निश्चित करण्यात आले.

किंग चार्ल्स-तृतीय यांना हाइड पार्क, लंडन टॉवर व नौदलाच्या जहाजांवरुन तोफांची सलामी दिली जाईल. त्यानंतर एडीनबर्ग, कार्डिफ व बेलफास्टमध्ये चार्ल्स यांची राजेपदी नियुक्ती कण्यात आल्याची घोषणा वाचली जाईल. शाही परंपरेनुसार सर्वात शेवटी चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाचा औपचारिक सोहळा होईल.

मागील 900 वर्षांपासून वेस्टमिंस्टर एब्बेमध्ये राज्याभिषेकाचा सोहळा होतो. विल्यम द कॉन्करर यांचा या ठिकाणी पहिला राज्याभिषेक झाला होता.
मागील 900 वर्षांपासून वेस्टमिंस्टर एब्बेमध्ये राज्याभिषेकाचा सोहळा होतो. विल्यम द कॉन्करर यांचा या ठिकाणी पहिला राज्याभिषेक झाला होता.

किंग झाल्यानंतरही मुकुटासाठी करावी लागेल प्रतीक्षा

चार्ल्स यांना कोरोनेशन अर्थात राज्याभिषेकासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागेल. कारण त्याच्या तयारीसाठी मोठा अवधी लागतो. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनाही यासाठी जवळपास 16 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली होती. फेब्रुवारी 1952 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर जून 1953 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला होता.

बातम्या आणखी आहेत...