आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:देशात आज सक्रिय रुग्णांची संख्या 3.50 लाखांवर जाण्याची शक्यता; गेल्या एक महिन्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाखांवर पोहोचली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकमधील चित्रदुर्गा जिल्हामध्ये अभिनेता राजकुमार यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी लोकांनी कोरोना नियमाचे पालन न करता गर्दी केली - Divya Marathi
कर्नाटकमधील चित्रदुर्गा जिल्हामध्ये अभिनेता राजकुमार यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी लोकांनी कोरोना नियमाचे पालन न करता गर्दी केली

देशात कोरोना संक्रमनामुळे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज देशात नवीन रुग्णांची संख्या ही 40,611 आढळली असून यात 29,735 उपचार घेत बरे झाले आहेत. तर 197 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल रविवारी देशामध्ये 47,009 नवीन रुग्ण आढळून आले होते. गेल्या आठवड्यामध्ये पहिल्यांदा नवीन रुग्णांच्या संख्येत एवढी घट पाहायला मिळाली आहे. यापूर्वी 14 मार्चला 26,413 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यामध्ये सतत वाढ होत गेली.

गेल्या चोविस तासांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 10,676 ने वाढ झाली आहे. सध्या देशात 3 लाख 42 हजार 344 रुग्ण उपचार घेत आहे. आज हा आकडा 3.50 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. देशात आजघडीला एकूण 1 कोटी 86 लाख 330 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले असून 1 कोटी 11 लाख 79 हजार 59 रुग्ण बरे झाले आहे. तर 1 लाख 60 हजार लोकांचा मृत्यूही झाला आहे. हे सर्व आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...