आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्यामुळे स्वत:ला नुकसान पोहोचवणाऱ्या मुलांची संख्या गेल्या ११ वर्षांत १६३% वाढली आहे. यामध्ये बहुतांश मुले ११ ते १४ वर्षांचे आहेत. डार्टमाऊथ कॉलेजच्या संशोधकांनुसार, ४७ लाख ६८ हजार किशोरवयीनांच्या डेटाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.
अशी मुले स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करून बाल रुग्णालयात दाखल झाली. अहवालानुसार, २००९ आणि २०१९ दरम्यान, मनोविकार रुग्णालयांत २५.८% मुले दाखल झाले आणि यात सुमारे १.३७ डॉलर अब्ज खर्च झाले. २००९ मध्ये आत्महत्या वा स्वत:ला नुकसान पोहोचवणाऱ्या मुलांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांत ३०.७% मुले किंवा किशोर होते. ही संख्या २०१९ मध्ये वाढून ६४.२% झाली. आत्मघाती पाऊल उचलण्याची प्रकरणे २००९ मध्ये ३.५% होती. ही २०१९ मध्ये १२.७% झाली. स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमध्ये बाल आणि किशोर मनोविकार विभागाच्या संचालिका डॉ. गेब्रियल ए.कार्लसन यांच्यानुसार अमेरिकी युवांमध्ये आत्महत्या वर्तनात झालेली वाढ नवी नाही. मात्र, संशोधन आपल्या आरोग्य प्रणालीच्या समस्येला रेखांकीत करते. नुकतेच मुलांवर उपचार करण्यासाठी आलेल्या पालकांना प्रत्येक पातळीवर अडचणीचा सामना करावा लागला.
मुलींच्या मानसिक आरोग्यातही वेगाने झाला बदल मुलींच्या मानसिक आरोग्यातही बदल आला आहे. २००९ मध्ये ५१.८% मुली रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही संख्या २०१९ मध्ये ६१.१% झाली. २००९ मध्ये आत्मघाती वर्तनासाठी भरती ४९ हजार मुली दाखल झाल्या होत्या, २०१९ मध्ये वाढून १.३ लाख झाल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.