आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगात काेराेनापासून संरक्षणासाठी लसीकरण वेगाने सुरू आहे, परंतु नवीन रुग्णांची संख्या कमी हाेताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत ४, ४२,५४५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे एकत्र करून जगातील बाधितांचा आकडा १२ काेटींहून जास्त झाला. सर्वात बाधित अमेरिकेत ४८ हजार ८०८ नवे रुग्ण आढळले. आता अमेरिकेतील बाधितांची एकूण संख्या ३ काेटींहून जास्त झाली. आता अमेरिकेतील एकूण बाधित ३ काेटी ४३ हजार ६६२ झाली आहे. परंतु जगातील सर्वात जास्त नवे रुग्ण ब्राझीलमध्ये आढळून येत आहेत. चाेवीस तासांत ७० हजार ९३४ रुग्ण आढळले.
दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्वात जास्त रुग्ण ब्राझीलमध्ये आढळून आले. त्यानंतर फ्रान्स, इटलीचा क्रमांक लागताे. येथे अनुक्रमे २९ हजार ७५९ व २६ हजार ६२ रुग्ण आढळून आले. सर्वात जास्त नव्या रुग्णांच्या बाबतीत भारत आता पाचव्या क्रमांकावर आहे. या महिन्यात सर्वाधिक बाधित रुग्णांत भारत अव्वल दहा देशांच्या यादीतून बाहेर झाला हाेता.
सर्वाधिक मृत्यू ब्राझीलमध्ये, भारत १२ व्या स्थानी
जगभरात हाेणाऱ्या मृत्यूंपैकी पहिल्या स्थानी ब्राझील आहे. गेल्या चाेवीस तासांत १ हजार ९४० झालेल्या मृत्यूसह ब्राझीलमध्ये काेराेनामुळे झालेल्या मृतांची संख्या २ लाख ७७ हजार २१६ झाली. १ हजार ३७ मृत्युमुळे अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. ५,४६, ६०५ मृत्यूसह जगात सर्वाधिक मृत्यू तेथे झाले आहेत. तिसरे सर्वाधिक मृत्यू हाेणाऱ्या भारतात २४ तासांत देश १२ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मृत्यू सध्या तरी तुलनेने कमी आहेत.
वटवाघळांतील किरकाेळ बदलानंतर मानवाला काेराेनाचा संसर्ग
वटवाघळांतील किरकाेळ बदलानंतर काेराेना विषाणूची मानवाला बाधा झाली हाेती, असा दावा एका अभ्यासातून करण्यात आला. मानवात प्रवेश करण्यापूर्वीच या विषाणूने वटवाघळात एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला बाधित करण्याची क्षमता मिळवली हाेती. काेराेना संसर्ग पसरवणाऱ्या विषाणूच्या हजाराे जीनाेम सिक्वेन्सचे विश्लेषण करून हा दावा करण्यात आला हाेता. हा अभ्यास पीएआेएस बायाेलाॅजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला. महामारीच्या सुरुवातीच्या ११ महिन्यांत विषाणूत अल्प स्वरूपाचे जेनेटिक बदल झाले हाेते, असे यातून दिसून आले हाेते.
जाॅर्डनमध्ये काेराेनामुळे सहा लाेकांचा मृत्यू; आराेग्यमंत्र्याचा राजीनामा
सल्त । जाॅर्डनच्या आराेग्यमंत्र्यांनी राजधानी अम्मानजवळील एका रुग्णालयात आॅक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान बशल-उल-खसावना यांनी आराेग्यमंत्री नादिर उबेजात यांना राजीनामा देण्याची सूचना केली हाेती. अम्मानपासून २० किलाेमीटरवरील सल्त येथील सरकारी रुग्णालयात ही घटना घडली. जॉर्डन सरकार या मृत्युमुळे सतर्क झाल्याचे दिसते. त्यामुळेच कोणताही रोष नको म्हणून सरकारने मंत्र्याला पदावरून हटवले आहे. त्याचबरोबर प्रशासनालाही दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.