आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. ८४ देशांत नव्या रुग्णांचे प्रमाणही वाढले. अमेरिकेसह काही देशांतील रुग्णांची संख्या पंधरा दिवसांत दुपटीवर पोहोचली आहे.
डेल्टा व्हेरिएंट व लोकांच्या बेपर्वाईमुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे तज्ञांनी सांगितले. गुरूवारी जगभरात कोरोना ७.४८ लाख नवे रुग्ण समोर आले आहेत. हा ८४ दिवसांतील सर्वात मोठा आकडा आहे. या आधी १४ मे रोजी ७.१८ लाख लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता.
गेल्या एक आठवड्यात ४० लाख नवे रुग्ण समोर आले. त्यापैकी मोठी संख्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत गुरूवारी १.२० लाख नवे रुग्ण आढळून आले. ही संख्या जगात सर्वाधिक आहे. २१ जुलै रोजी सुमारे ६० हजार रुग्ण आढळले होते. जपानमध्ये पहिल्यांदा १५ हजारांहून जास्त रुग्ण आढळले. त्यातही बाधितांची जास्त संख्या टोकियाेत आहे. गुरूवारी नव्या रुग्णांचे प्रमाण ५ हजारावर गेले. चीनच्या १८ प्रांतातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आॅस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात नवे रुग्ण असून सहाव्यांदा लाॅकडाऊन लागू झाला आहे. त्याशिवाय अनेक देशांनी संसर्ग रोखण्यासाठी लस पासपोर्ट अनिवार्य करण्यात आला. त्यात फ्रान्स,इटली, स्पेन व जर्मनीसारख्या देशांचा समावेश आहे. परंतु लोक त्यास विरोध करत आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग गुरूवारी म्हणाले, या महिन्याच्या अखेरीस वेगवेगळ्या देशांपर्यंत २ अब्ज लस पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. चीन किती डोस विकणार आहे? तसेच गरीब देशांना किती प्रमाणात मोफत वाटप करणार आहे? याची माहिती मात्र जिनपिंग यांनी दिली नाही.
इटलीत शिक्षकांसाठी हेल्थ पास अनिवार्य
इटलीच्या सरकारने शाळांसाठी हेल्थ पास अनिवार्य केला आहे. शाळेत सर्व वर्गात प्रवेश करण्यापूर्वी कोविड-१९ तपासणीतून रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्याशिवाय रेल्वे, विमान, जहाज प्रवासातही ग्रीन पास अनिवार्य करण्यात आला आहे. इटलीत गुरूवारी ७,२३० नवे रुग्ण नोंदवण्यात आले. ३,३७१ लोक काेरोनामुक्त झाले. २७ जणांचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.