आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामाबाद:पाकिस्तानात बाधितांची संख्या गेली 5 हजारांवर; इस्लामाबादमध्ये 113 जण बाधित, एकाचा मृत्यू

इस्लामाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये 34 जण बाधित आहेत

पाकिस्तानात जागतिक महामारी काेराेनाचा कहर वाढत चालला आहे. रविवारी बाधितांची संख्या ५ हजार ३० झाली आहे. विषाणूची बाधा झाल्यामुळे ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. आराेग्य विभागाने शनिवारी रात्री ही माहिती दिली.

पाकिस्तानातील पंजाब व सिंध प्रांत काेराेना व्हायरसचे केंद्र बनले आहे. दाेन्ही प्रांतात क्रमश: २ हजार ४१४ व १ हजार ३१८ संशयितांचा दुजाेरा देण्यात आला आहे. खैबर पख्तुनख्वामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. आणखी ६९७ लाेक बाधित झाले आहेत. सिंध प्रांतात २८, तर पंजाबमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे.  बलुचिस्तानमध्ये २२० व गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये २१५ जण बाधित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राजधानी इस्लामाबादमध्ये ११३ जण बाधित असून एकाचा मृत्यू झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ३४ जण बाधित आहेत. विविध रुग्णालयांत ४ हजार १६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. उपचारानंतर ७६२ लाेकांना घरी पाठवण्यात आले आहे.  देशात आतापर्यंत ५७ हजार ८३६ जणांची तपासणी करण्यात आली. आगामी काही दिवसांत तपासणी संख्या वाढवण्यात येणार आहे. दक्षिणेकडील बंदर कराचीत बाधित आढळून आल्यामुळे काही भाग सील करण्यात आला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा २१ एप्रिलपर्यंत वाढण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...