आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Only Way To Save The Earth's Air And Water Is To Mirror The Sun; Pilot Project To Cover 10% Of Agricultural Area With Glass |marathi News

चर्चा:पृथ्वीवरील हवा-पाणी वाचवण्यासाठी सूर्याला आरसा दाखवणे हाच उपाय; 10 टक्के शेती क्षेत्राला काचेने झाकण्याचा पथदर्शी प्रकल्प

अमेरिकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तापणाऱ्या पृथ्वीची उष्णता कमी करण्यासाठी प्रदूषण रोखणे हा उपाय नाही

कार्बन उत्सर्जन कमी करण्याआधी जमिनीच्या एका भागाला सूर्याच्या उष्णतेपासून वाचवावे. त्याचा सहज, स्वस्त असा उपाय म्हणजे सूर्याला आरसा दाखवणे.हार्वर्ड विद्यापीठातील प्रमुख संशोधक व मिरर्स फॉर अर्थस एनर्जी रिडिस्ट्रिब्युशन संस्थेचे (मियर्स) संस्थापक डॉ. ये टाओ यांचा हा दावा आहे. त्यांच्याशी भास्करचे रितेश शुक्ल यांनी केलेली चर्चा..

प्रदूषण रोखणे हा उपाय नाही?

भारत, चीन, आफ्रिकेत वायू प्रदूषण एकदम रोखले तर या भागातील उष्णतेत प्रचंड वाढ होईल. अशा स्थितीत पृथ्वीवरील तापमान एका आठवड्यात २ अंशांची लक्ष्मण रेषा ओलांडू शकते. काही संशोधकांनी तर ही सीमा अप्रत्यक्षपणे ओलांडल्याचा दावा केला आहे. {सूर्याला आरसा दाखवणे हाच एकमेव उपाय कसा?

ग्लोबल वॉर्मिंगचे गणित पाहिले पाहिजे. त्यानुसार एखादा उपाय लागू करताना एक युनिट ऊर्जा लागणार असेल तर १०० युनिट उष्णतेत घट व्हायला हवी. फॉसिल फ्यूएल हाच एकमेव विश्वसनीय इंधनाचा स्रोत आहे. त्याचा तत्काळ इंधन म्हणून वापर होऊ शकतो. पाणी, जमीन व भोजनाचे संरक्षण करता येईल अशी उपाययोजना असावी. त्यामुळे सूर्याची उष्णता परत अंतराळात पाठवणे हाच उपाय आहे. आधी हे काम पृथ्वीवर बर्फाने आच्छादलेल्या प्रदेशाद्वारे व्हायचे. परंतु हे आच्छादन संकोचले आहे. त्यासाठी स्वस्त पर्याय म्हणून काचेचे कृत्रिम आच्छादन ठरेल.

प्रकल्पासाठी खर्च किती?
काच ८०० रुपये प्रति चौरस वर्ग मीटरने उपलब्ध होऊ शकतो. या काचेला लावण्यासाठी बांबूचा वापर केला पाहिजे. या प्रकल्पावर जगाच्या एकूण जीडीपीपैकी ३ टक्के एवढा खर्च येईल.

हे आरसे कोठे लावले पाहिजेत?
गरीबांच्या घरांच्या छतावर. कारण त्यांना गारवा वाटू लागेल. शेतात लावावेत. त्यामुळे खते टिकून राहिल. सिंचनासाठी पाणीही कमी लागेल व उत्पन्न वाढेल. १० टक्के रिफ्लेक्टिव्हिटी वाढवल्यास तापमानात १ ते ७ टक्क्यांनी घट होतेे. शेतात हे प्रमाण २ ते १० अंशांनी कमी होते. सिंचनासाठी ३० टक्के पाणी कमी लागेल. जमिनीत १० सेंमी खोलपर्यंत आर्द्रता कायम राहील.

प्रकल्पासाठी अहमदाबादची निवड का?
हवामान बदलाच्या लढाईत भारताचे प्रमुख योगदान आवश्यक आहे. अहमदाबादच्या शिक्षण संस्था, तरूण संशोधक, शेतकरी, मजूरांनी या प्रयोगात सहभागी होण्याची उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे पथदर्शी प्रकल्पाची रुपरेखा येथे पडताळली जात आहे. प्रोजेक्ट टीम तयार झाली आहे. ग्राउंड सर्वे सुरू आहेत. लवकरच तेथे सूर्याला आरसा दिसू लागेल.

बातम्या आणखी आहेत...