आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेक्सिको शहरातील अल्माडा सेंट्रल पार्कजवळील पलासियो डी बेलस आर्टेस हे शहरातील पहिले सांस्कृतिक संग्रहालय आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर हे संग्रहालय सामान्यांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. येथे सर्वात मोठे ऑपेरा हाऊस आहे. ते एप्रिलपासून सुरू झाले असून येथे देश-विदेशातील लोक हजेरी लावत आहेत. संग्रहालयात नृत्य, संगीत, नाटकांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगातील उत्कृष्ट मूर्तिकला, िचत्रकला, फोटोग्राफीचेही दर्शन होते. संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावर नॅशनल म्युझियम ऑफ आर्किटेक्चर आहे.
९० वर्षांपूर्वीचे सांस्कृतिक संग्रहालय
1904 मध्ये इटालियन वास्तुशिल्पकार एडमो बोरीने बांधकाम सुरू केले, पण राजकीय समस्येमुळे १९१३ पर्यंत निर्माण कार्य ठप्प झाले होते.
1932 मध्ये मेक्सिकोचे वास्तुशिल्पकार फेडेरिको यांनी काम पुन्हा सुरू करून ते १९३४ मध्ये पूर्ण केले. मेक्सिकोचे हे पहिले संग्रहालय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.