आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Owner Of A Company Worth Rs 8,000 Crore Goes To The Office On A Bicycle, Far From Photo publicity!; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:आठ हजार कोटींच्या कंपनीचा मालक सायकलने कार्यालयात जातो, फोटो-प्रसिद्धीपासूनही दूरच!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलंडच्या फॅशन उद्योजकाची कहाणी, साधेपणाची आवड

मारेक पिकॉच हे ८ हजार कोटींच्या कंपनीचे मालक आहेत. ते कार्यालयात सायकलने जातात. फोटो काढू देण्याचेही ते टाळतात. एलपीपी एसए कंपनीचे ते मालक आहेत. ६० वर्षीय पिकॉच यांनी ८ हजार १५९ कोटी रुपयांची संपत्ती उभी केली. परंतु आपल्या वैयक्तिक आयुष्यातून साधेपणाला कधी कमी केले नाही. एलपीपी पोलंडची सर्वात मोठी फॅशन रिटेलर कंपनी आहे. पिकॉच झगमगाटापासून दूर राहणे पसंत करतात. कुणी त्यांचे छायाचित्र काढत असेल तर पिकॉच ते टाळतात. ते कार ऐवजी सायकलने कार्यालयात जातात.

मला अब्जाधीश म्हणू नका. ही संपत्ती माझी नाही. २०१८ मध्ये मी आपले शेअर फाउंडेशनला हस्तांतरित केले होते. मी, माझ्या कुटुंबातील सदस्य व इतर अनेक लोक फाउंडेशनचे लाभार्थी आहेत. पिकॉच फॅशन उद्योगातील दिग्गज आहेत. त्यानंतरही ते कॅटवॉक शो, सेलिब्रिटी इव्हेंट्स किंवा बिझनेस पार्टी अशा ठिकाणी जाणे टाळतात. एलपीपीचे मुख्यालय डान्स्क शहरात आहे. पिकॉचने येते आपले स्वतंत्र कार्यालय सुरू केेलेले नाही. ते डिझायनर टीममध्ये सामान्य डेस्कवर काम करतात.

एलपीपीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्लावोमिर लोबोडा म्हणाले, एलपीपीचे स्वामित्व मॉडेल खूप चांगले आहे. त्यानुसार एलपीपीची कधीही विक्री केली जाणार नाही. पिकॉच यांना आपल्या कर्मचाऱ्यांचे हित हवे आहे. त्यांनी नफ्याचा वापर डिझायनरच्या वेतनवाढीसाठी केला. पिकॉच यांनी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य दिले.

तुर्कीहून स्वेटरची आयात, आज २५ देशांत दालने
पिकॉचने १९९१ मध्ये व्यवसाय सुरू केला होता. तेव्हा पोलंड एका बाजार अर्थव्यवस्थेत रूपांतरित होत होता. सुरुवातीला पिकॉच यांच्या कंपनीने तुर्कीहून स्वेटर आयात केले. एलपीपीचे पोलंड, जर्मनी, रशियासह २५ देशांत १८०० हून जास्त दालने आहेत. या ब्रँडमध्ये रिजर्व्ड, मोहितो, क्रॉपचा समावेश आहे. त्यांचे दर नेहमी पश्चिमेकडील प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत कमी असतात.

बातम्या आणखी आहेत...