आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीने ऑक्सफर्ड डिक्शनरीलाही गोंधळात टाकले आहे. अस्थिरता असलेल्या कोरोना वर्षाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ डिक्शनरीला निवडता आला नाही. त्यांनी अद्वितीय १२ महिने सांगत वर्ड ऑफ द इयरऐवजी या वर्षी शब्दांची यादी जाहीर केली आहे. महामारीने इंग्रजी भाषेवर खूप जलद व व्यापक प्रभाव टाकल्याचे ऑक्सफर्ड डिक्शनरी प्रकाशित करणारी कंपनी ऑक्सफोर्ड लँग्वेजेसने मान्य केले आहे. अध्यक्ष कास्पर ग्रॅथव्होल म्हणाले की, भाषेच्या दृष्टीने आम्ही असे वर्ष कधीच पाहिले नाही. दरवर्षी आमची टीम शेकडो नवे शब्द आणि त्यांच्या वापराची माहिती घेते. मात्र, २०२० ने आम्हाला नि:शब्द केले आहे. यात एवढे शब्द आले की निवड करणे कठीण जात आहे.
ज्याचा जगभरात व्यापक वापर वाढला असेल असा इंग्रजी भाषेचा शब्द ऑक्सफर्ड लँग्वेजेस दरवर्षी निवडत असते. तो ऑक्सफोर्डच्या ११०० कोटी शब्दसंग्रहातून निवडला जातो. आतापर्यंत सेल्फी, वॅप आणि अनफ्रेंड, टॉक्झिक शब्द निवडले गेले. गेल्या वर्षी तो क्लायमेट इमर्जन्सी होता. मात्र, २०२० अाले आणि कंपनीने एक शब्द निवडण्यास नकार दिला. कंपनीच्या हेड ऑफ प्राॅडक्ट कॅथरीन कॉन्नॉर मार्टिन म्हणाल्या, या वर्षी पॅनडेमिक शब्दाचा वापर ५७०००% वाढला. कोरोनाव्हायरस शब्द याआधी १९६८ मध्ये वापरला गेला होता आणि वैद्यकीय संदर्भाबाहेर खूप कमी वापरला गेला. मात्र, यंदा त्याचा वापर वाढला. एप्रिलमध्ये तो सर्वाधिक वापरला जाणारा शब्द टाइमच्याही पुढे गेला. जानेवारीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या बातम्यांमुळे इम्पीचमेंट शब्द प्रचलित होता. मात्र, एप्रिल येईपर्यंत कोरोनाव्हायरस पुढे गेला. तर मे महिन्याच्या अखेरीस ब्लॅक लाइव्हज मॅटर, जूनटेंथसारख्या शब्दांचा वापर वाढला. त्या वेळी पॅनडेमिक शब्दाचा वापर होत नव्हता. गेल्या वर्षीचा वर्ड आॅफ इयर क्लायमेट इमर्जन्सीचा वापर महामारीने वेग घेतल्याबरोबर ५०% पर्यंत घसरला.
कॅथरिन यांच्यानुसार महामारीने सोशल डिस्टन्सिंग किंवा फ्लॅटन द कर्व्हसारखे शब्दही घरोघरी बोलले जाऊ लागले. लॉकडाऊन आणि स्टे अॅट होमसारखे खूप वापरले गेले. आधी रिमोट, व्हिलेज, आयलँड आणि कंट्रोल सारखे शब्द एकाच वेळी दिसायचे. मात्र, आता लर्निंग, वर्किंग आणि वर्क फोर्स सोबत दिसू लागले. यंदा शब्दही दहशतीत राहिले. मात्र, २०२१ जास्त आनंददायक, सकारात्मक शब्द घेऊन येईल.
कोरोनाचे सावट : वर्केशन, ट्विंडेमिक, अनम्यूट, झूमबॉम्बिंगसारखेही शब्द
ऑक्सफर्डच्या यादीवर कोरोनाचा प्रभाव आहे. यात अँटी- व्हॅक्सर (व्हॅक्सिन विरोधी), अँटी- मास्क (मास्क विरोधी), अँथ्रोपाॅज (फिरण्यावर जागतिक बंदी), बीसी (बिफोर कोविड), ब्लॅक लाइव्हज मॅटर, बबल, कोविडिएट (कोरोना गाइडलाइन न मानणारे), फ्लॅटन द कर्व्ह, ट्विंडेमिक (दोन महामाऱ्या एकत्र येणे), अनम्यूट (मायक्रोफोन चालू करणे), वर्केशन (सुटीत काम करणे), झूमबॉम्बिंग (व्हीसी कॉलमध्ये घुसखोरी करणे) सारखे शब्द आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.