आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:ऑक्सफर्डच्या लसीने माकडांत संसर्गही थांबला, मानवी चाचणी तीन टप्प्यांत, नंतर लस येणार

लंडन/ नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनुसार, मानवी चाचणी यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत लस

कोरोना विषाणूबाधेवर गुणकारी लस शोधण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने उत्साह वाढवणारी माहिती जाहीर केली आहे. संशोधकांनुसार, ६ माकडांच्या एका समूहावर केलेली लसीची चाचणी यशस्वी झाली आहे. या माकडांना कोरोनाचा डोस देण्यापूर्वी ही लस देण्यात आली. यात माकडांमध्ये १४ दिवसांतच अँटीबॉडीज विकसित झाल्या. काहींना २८ दिवस लागले. सध्या या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. या चाचणीचे तीन टप्पे असतील. एक हजार लोकांवर ही चाचणी सुरू असून त्याचे परिणाम याच महिन्यांत हाती येतील. संशोधकांनुसार, मानवावर या लस चाचणीचे परिणाम सकारात्मक आले तर लस लवकरच बाजारात येऊ शकेल. ऑक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रुप आणि जेनर इन्स्टिट्यूट संयुक्तरीत्या कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. यात जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सहभागी आहे. 

संशोधकांनी गुरुवारी सांगितले की, कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर या लसीने माकडांच्या फुफ्फुसांगना संसर्ग होण्यापासून वाचवले आणि विषाणूलाही शरीरात वाढण्यापासून रोखले. याबाबत लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसनचे प्रोफेसर डॉ. स्टिफन इव्हान्स म्हणाले, “वास्तविक ही आनंददायी बातमी आहे. ऑक्सफर्ड लसीने एक मोठा अडथळा ओलांडला आहे. माकडांवरील चाचणीला वेगळे महत्त्व असले तरी अनेकदा प्रयोगशाळेत अशा लस माकडांचे विषाणूपासून संरक्षण करतात परंतु मानवात त्या गुणकारी ठरत नाहीत. या संशोधनात नकारात्मक परिणाम दिसलेला नाही.’

तज्ज्ञांच्या मते, एका लस शोधून काढण्यासाठी १० वर्षे लागू शकतात. मात्र, नामांकित संशोधक अहोरात्र झटत आहेत. पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की आम्ही अॉक्सफर्ड-जेनर इन्स्टिट्यूटच्या संपर्कात आहोत. सर्व योग्य झाले तर सप्टेंबरपर्यंत लस बाजारात येऊ शकेल.

चीनचा दावा : ५ लसींची मानवी चाचणी सुरू

५ प्रकारच्या लसींची मानवी चाचणी दुसऱ्या टप्प्यात असल्याचा दावा चीनने केला. काही चाचण्यांना पुढील महिन्यांत मंजुरी दिली जाईल. उपमंत्री जंेग यिशिंग म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात या ५ लसींची २००० लोकांवर चाचणी झाली आहे. जुलैमध्ये याचे परिणाम दिसून येतील. चाचणीदरम्यान रुग्णांवर अजून तरी गंभीर साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांत कोरोना विषाणूवरील लसीच्या मानवावर चाचण्या सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...