आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानमध्ये तालिबान शासन आल्यानंतर पाकिस्तानसोबतचे त्यांचे संबंध सतत बिघडत आहेत. पाकिस्तानात सुरू असलेल्या तणावाने आता हिंसक रूप घेतले आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सुरक्षा दलांत चकमक उसळली आहे. बलुचिस्तान राज्यताील चमनमध्ये लष्करात चकमक झाली. तेथील हे छायाचित्र आहे. मात्र, ही चकमक उडाल्याने दोन्ही पक्ष एकमेकांना जबाबदार धरत आहेत. गुरुवारी पाकिस्तानी शहर चमनच्या मुख्य रुग्णालयात आणीबाणी घोषित केली अाहे. पाकिस्तानला सीमेवरील नाजूक स्थिती आणि गोळीबारासाठी जबाबदार ठरवले आहे. कंदहारच्या स्पेन बोल्डकमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार केला जात होता.
राजदूताला बोलावून निषेध नोंदवला पाकिस्तानने गोळीबाराच्या विरोधात अफगाण राजदूला बोलावून विरोध नोंदवला. अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह म्हणाले, काेणत्याही समस्येचे निराकरण चर्चेद्वारे होऊ शकते,असे आपला देश मानतो. अशा प्रकारचा गोळीबार करून युद्धाचे बहाणे शोधणे कुणासाठीही योग्य नाही.
120 किमी लांब आहे बलुचिस्तान राज्याची राजधानी क्वेटा, काही अंतरावर चमन सीमा 10 हजार लोक रोज या व्यग्र क्रॉसिंगवरून
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.