आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाविरुद्ध युक्रेनच्या अब्जाधीशाचे सशस्त्र लष्करी प्रशिक्षण:देशभक्ती चार्टर बटालियनने लोजोवाहून रशियन सैन्याला पिटाळले होते

कीव्हएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योजक ते लष्करी कमांडर बनलेले वसेवोलॉड कोझेम्याको युक्रेनमधील सर्वात मोठ्या अब्जाधीशांपैकी आहेत. युक्रेनमधील सर्वात मोठ्या धान्य उत्पादन, भांडार व निर्यात कंपन्यांपैकी असेल्या अॅग्रोट्रेड समुहाचे संस्थापक व सीईआे आहेत. परंतु आता त्यांनी सर्व लक्ष युद्धावर केंद्रित केले आहे. मी एक उद्योगपती आहे. परंतु युक्रेनमध्ये सध्या एका लष्करी तुकडीचा कमांडर आहे, असे सांगतात. वसेवोलॉद कोझेम्याको यांनी आपल्या लाइट इन्फेन्ट्री बटालियनची स्थापना केली व त्याचे ते नेतृत्व करतात. त्याला आैपचारिकदृष्ट्या चार्टरच्या रुपाने पाहिले जाते. त्यात बहुतांश नागरिक असतात. त्याला अनौपचारिक भाषेत अब्जाधीशाची बटालियन असेही संबोधले जाते. इतर श्रीमंत युक्रेनी व्यक्तींसोबत कोझेम्याको प्रशिक्षण व शस्त्र-वाहनांचा खर्चही उचलतात. त्यांचे युनिट लष्कराकडून दिशा निर्देश घेतात. परंतु काम मात्र स्वतंत्रपणे केले जाते. ५२ वर्षीय कोझेम्याको मॅरेथॉन रनरही राहिले आहेत. २०१७ मध्ये न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन त्यांनी ३ तासांहून कमी वेळेत पूर्ण केली. त्यांना उंची कपडे, परदेशी भ्रमंती यांची आवड आहे. त्यांनी युद्धापूर्वी स्वित्झर्लंड, ऑस्ट्रियामध्ये स्की इन्फेन्ट्री व यॉटवर घालवलेल्या सुटीतील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर दिसतात. कोझेम्याको यांना चार मुले आहेत. ते हजारो एकर शेतीचे मालक आहेत. ही शेती ते १५०० हून जास्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने सांभाळतात. गेल्या १०० हून जास्त दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाचे खारकिव्हवर हल्ले सुरूच आहेत.

विशेष मार्शल लाॅअंतर्गत बटालियन वैध
बटालियन टेरिटोरियल डिफेन्स युनिट आहे. युद्धाची गरज संपेपर्यंत हे बटालियन सक्रिय राहू शकते. अशा अनेक युनिटमध्ये अनेक स्थानिक पुरूषांचे गट आहेत. ते वाळूने भरलेल्या पोत्यांचा आधार घेत रशियन सैन्यावर गोळीबार करतात. विशेष मार्शल लॉ अंतर्गत हे युनिट अधिकृत आहे.

बातम्या आणखी आहेत...