आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइराणमध्ये सरकारच्या दडपशाहीनंतरही हिजाब आणि इस्लामिक शासनाला विरोध सुरूच आहे. आंदोलन नव्या रूपात समोर येत आहेत. आंदोलकांनी आंदोलनाला नवे रूप दिले आहे. काही भागांत रस्त्यांवर आंदोलन सुरू आहे. शासनात मतभेदांचे संकेत मिळत आहेत. बैरूतच्या इस्साम फेयर्स इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक पॉलिसी अँड इंटरनॅशनल अफेयर्सच्या अमेरिकी विद्यापीठात इराण विषयाचे तज्ज्ञ अली फतेहउल्ला निजाद म्हणाले की, नोव्हेंबर २०२२ पासून आंदोलनात घट आली आहे. आता इराणी चलनात घसरण आल्यानंतर आर्थिक संकटावरून आंदोलन होऊ शकते. हे लवकरच राजकीय रूप घेऊ शकते. रस्त्यांवरील आंदोलना घट आली.मात्र, संप आणि संपत्तीला नुकसान पोहोचवत आहेत.
आंदोलन मोडीत काढण्यावरून सरकारमधील मतभेद समाेर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनांचा सामना करण्याच्या पद्धतीवरून शासनात मतभेद आहेत. हेरगिरीच्या आरोपात माजी संरक्षणमंत्री अकबरी यांना फाशीची शिक्षा देणे याचाच परिणाम मानला जातो. अकबरी आंदोलकांच्या मागण्यांवर काही सवलती देण्याच्या विचाराचे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.