आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The People Of The Villages Are Helping Our Soldiers Standing On The Black Top, Carrying The Logistics On The Shoulders

भारत-चीन सीमेवर तणाव:ब्लॅक टॉपमाउंटेनवर तैनात असलेल्या सैनिकांना विनामुल्य मदत करत आहेत गावातील लोक, खांद्यावर पोहोचवताय अत्यावश्यक वस्तू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या काळात लडाख येथील पँगॉन्ग लेकच्या दक्षिण किनाऱ्याच्या प्रमुख पर्वतांच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये भारतीय सैन्याच्या जवानांनी झेंडे रोवले आहेत. या परिसरातील आजुबाजूच्या गावांतील लोक भारतीय जवानांना सातत्याने मदत करत आहेत. चुशूल गावातील जवळपास 60 लोक ब्लॅक टॉप माउंटेनवर पाणी आणि आवश्यक वस्तू पोहोचत आहेत.

पहिले भारतीय सैन्याने प्रत्येक घरातील एका व्यक्तीला पोर्टरच्या रुपात कामावर ठेवले होते. यासाठी त्यांना पैसेही दिले जात होते. आता लोकांनी भारतीय सैन्याला विनामुल्य मदत करण्यास सुरूवात केली आहे. आज सलग पाचव्या दिवशी चुशूल येथील लोकांनी सैनिकांना सेवा दिली. रविवारपासून मान मरक गावातील ग्रामस्थ हे काम करतील.

या परिसराच्या आजुबाजूला जवळपास 170 कुटुंब राहतात
या परिसराच्या आजुबाजूला जवळपास 170 कुटुंब राहतात

सैन्याचे ट्रक अर्ध्या रस्त्यापर्यंत पाणी घेऊन जातात. त्यानंतर स्वयंसेवकांना ब्लॅक टॉप माउंटेनच्या शिखरावर जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत पाणी आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन जावे लागते. चुशूल गाव ब्लॅक टॉपपासून जवळ आहे. येथे जवळपास 170 कुटुंब राहतात.