आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दक्षिण ऑस्ट्रेलियात महामारीमुळे जगातील सर्वात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. गुरुवारी त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि नियमांतर्गत घरातील केवळ एका सदस्याला बाहेर पडण्याची परवानगी हाेती. दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रमुख स्टीव्हन मार्शलकडून देशात वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला. वास्तविक हा लॉकडाऊन लागू हाेण्यामागील कारण ठरले ते एका पिझ्झा वर्करचे खाेटे बाेलणे.
परंतु शनिवारी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन संपुष्टात आल्याचेही जाहीर करण्यात आले. अधिकारी म्हणाले, राज्यात आता संपर्कात आलेल्यांचा शाेध व तपासणी माेहीम राबवली जात आहे. एक काेराेना पाॅझिटिव्ह म्हणाला, केवळ एकदा पिझ्झा खरेदी करण्यात घराबाहेर पडलाे हाेते. हे पाहून अधिकाऱ्यांनी राज्यात काेराेनाचा एखादा धाेकादायक वाहक असल्याचा कयास लावला. ताे लाेकांना बाधित करू शकताे, असे त्यांना वाटले. त्यानंतर संपूर्ण राज्यात अतिशय कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र काही काळानंतर तो खाेटे बाेलत असल्याचे लक्षात आले. ताे पिझ्झा खरेदीसाठी नव्हे तर ताे पिझ्झा सेंटरमध्ये नाेकरी करत असल्याचे समजले. पाॅझिटिव्ह हाेण्याआधीदेखील त्याने अनेक शिफ्टमध्ये काम केले हाेते.
पंतप्रधान स्टीव्हन मार्शल म्हणाले, या व्यक्तीने रुग्णांचा शाेध घेणाऱ्या टीमला खरे सांगितले असते तर मला सहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा लागला नसता. प्रशासनासमाेर एक माेठी चिंता आहे. त्यांना आता पिझ्झा सेंटरमधील या कामगाराच्या संपर्कात आलेल्या गटाचा शाेध घ्यायचा आहे. त्याचे विलगीकरण करायचे आहे. एवढे सगळे घडूनही त्या व्यक्तीच्या विराेधात काेणतीही कारवाई केली जाणार नाही. कारण दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या कायद्यात खाेटे बाेलल्यास काेणत्याही शिक्षेची तरतूद नाही. महामारीला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने व्यापक प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु काही ठिकाणी रुग्णसंख्य वाढत आहे.
दुसऱ्यांदा चाैकशीदरम्यान बाेलला खरा
ट्रेसिंग टीमने पिझ्झा वर्करसाेबत बसून त्याच्याशी प्रश्नाेत्तरे केली हाेती. दक्षिण ऑस्ट्रेलियाचे पाेलिस आयुक्त ग्रँट स्टीव्हन्स म्हणाले, टीमला काही उत्तरे मिळाली. त्यावरून काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. टीमने पुन्हा भेट घेऊन चाैकशी केली. तेव्हा कुठे ही व्यक्ती पिझ्झामध्ये नाेकरी करत असल्याचे स्पष्ट झाले. ३६ तासांत काेराेना पॉझिटिव्ह समूहाचा शाेध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.