आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदा वास्तव्याला असलेल्या रोहिंग्यांच्या विरोधात २०२१ मध्ये अभियान चालवण्यात आले. त्यामुळेच स्थलांतरितांमधील महिला-मुलांसह ताब्यात घेतलेल्या रोहिंग्यांना हिरानगर येथील छावणीत ठेवण्यात आले आहे. मार्च २०२१ पासून कठुआ जिल्ह्यातील एक उपतुरुंगात स्थलांतरितांसाठी ही छावणी तयार करण्यात आली आहे. त्यात वयस्करांची संख्या २६० आहे. त्यात ५०-६० मुले आहेत.
या छावणीत आता आणखी १४ नवजातांची भर पडली आहे. एक ते दोन महिन्यांत रोहिंग्या समुदायातील आणखी सात महिलांची प्रसूती होणार आहे. त्यामुळे छावणीतील रोहिंग्यांच्या लोकसंख्येत आणखी भर पडणार आहे. परदेशी लोकांची ओळख पटवून त्यांना मायदेशी पाठवण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासन केंद्राच्या सूचनेनुसार २०२१ पासून एक अभियान राबवत होते. गृह विभागाच्या सूचनेनुसार २५० जणांसाठी ही छावणी तयार करण्यात आली होती.
मुलांच्या शिक्षणासाठी विशेष व्यवस्था : सूत्र म्हणाले, बेकायदा राहणाऱ्या रोहिंग्यांच्या लहान मुलांची व्यवस्था स्वतंत्र शिशुगृहात करण्यात आली आहे. तेथे मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी राेजगारपूरक प्रशिक्षण कार्यक्रमही राबवला जातो. पुरुष स्वेच्छेने निर्माण कार्यासारख्या कामांत सक्रिय आहेत. आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी छावणीत पुरेसा वेळ दिला जात नाही, अशी तक्रार रोहिंग्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.
बेकायदा रोहिंग्यांबद्दलचा अंतिम निर्णय गृह विभाग करणार
स्थलांतरितांसाठी उभारलेल्या छावणीतील एक अधिकारी म्हणाले, बेकायदा स्थलांतरितांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची फाइल आवश्यक कारवाईसाठी सीआयडी मुख्यालयात जमा केली आहे. आता चेंडू गृह विभागाच्या कोर्टात आहे. त्यांना मायदेशी पाठवण्याची सूचना मिळताच आम्ही रोहिंग्यांची सुटका करू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.