आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना संसर्ग:अमेरिकेत नोव्हेंबरपर्यंत लसीची शक्यता; राज्यांना वितरणाच्या तयारीचेही आदेश, सीडीसीचे निर्देश

वॉशिंग्टन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस वितरण स्थळे तत्काळ उभारा, काही बाबींतून मुभा द्या

कोरोना संसर्गाचा वेग हाताबाहेर जात असताना अमेरिकेत नाेव्हेंबरपर्यंत लस येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील राज्यांना नोव्हेंबरमध्ये कोरोना लसीच्या वितरणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सीडीसीने १ नोव्हेंबरपर्यंत लसीच्या वितरणाची शक्यता व्यक्त करत राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार, मॅकेसन कॉर्पोरेशन व सहायक कंपन्या लस वितरण साइटच्या परवान्यासाठी अर्ज करत आहेत. तत्काळ या वितरण स्थळांच्या उभारणीच्या अर्जांवर काम सुरू करावे. तसेच गरज भासल्यास अडथळा ठरणाऱ्या बाबींतून सूट द्यावी. न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांच्या म्हटले आहे की, काेराेनाच्या लसीवरील प्रयाेगात सुरक्षिततेची गंभीर त्रुटी नाही. लस दिल्यानंतर व्हायरसविरुद्ध लढण्याच्या प्रतिकार क्षमतेचा विकास होत आहे. अमेरिकी सरकारने मेरीलँडच्या गॅथर्सबर्गमध्ये नाेवाव्हॅक्स कंपनीला लसीसाठी १.६ अब्ज डाॅलर्स दिले आहेत.

सनाेफी-ग्लॅक्साेस्मिथक्लाइन मानवी चाचण्या सुरू करणार
लंडन | प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये काेराेना लसीचे सकारात्मक निकाल दिसल्यानंतर आता मानवी चाचण्या सुरू करणार असल्याचे सनाेफी व ग्लॅक्साेस्मिथक्लाइन या औषध कंपन्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत ४४० जणांवर चाचण्या घेतल्या जातील. डिसेंबरपर्यंत पहिला निकाल येऊ शकतो. या चाचण्या यशस्वी ठरल्या तर त्याच महिन्यात लसीचे उत्पादन सुरू केले जाईल. या कंपन्या १० कोटी डोस तयार करतील. पैकी ६ कोटी डोस ब्रिटन सरकार खरेदी करणार आहे.

0