आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Possibility Of Lower Petrol diesel Prices; International Crude Oil Prices Begin To Decline News And Updates

वाढत्या कोरोनाचा परिणाम:पाच दिवसानंतर पुन्हा स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑइलचे दर कमी होण्यास सुरुवात

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वच क्षेत्रांवर जाणवतोय इंधन दरवाढीचा परिणाम

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींच्या घसरणीमुळे देशांतर्गत पेट्रोलियम दरातही घट झाल्याचे दिसून येत आहे. युराेपच्या बहुतांश भागात काेराेना संक्रमणाची माेठी लाट आली असून तिचा परिणाम या भागात पहायला मिळत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पाच दिवसानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे. मंगळवारी पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 23 पैशानी स्वस्त झाले आहे. यामध्येही आणखी कपात होऊ शकते असा अंदाज आहे.

सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत आता ९०.५६ रुपये तर डिझेल ८०.८७ रुपये प्रती लिटर इतकी आहे. अलिकडे पेट्रोलच्या किमतींनी काही शहरांमध्ये १०० रुपये प्रति लिटरचा आकडा ओलांडला आहे, ज्यामुळे जास्त किमतींविरुद्ध जनतेचा रोष आणि वाहनांनाही महागडे इंधन मिळाल्याने सगळ्याच क्षेत्रात महागाईचा परिणाम दिसून आला आहे. राजस्थानातील गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर अजूनही १०० रुपये प्रती लिटर आहे. येथे पेट्रोल सध्या १०१.०१ रुपये तर डिझेल ९२.९६ रुपये प्रती लिटर आहे.

सोमवारी ब्रेंट क्रूड ६३ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीपर्यंत घसरला. त्याचप्रमाणे अमेरिकेतील क्रूडची विक्रीही कमी झाली. डब्ल्यूटीआयच्या कच्च्या तेलाचा व्यापार १.०५ टक्क्यांनी घसरून ५९.९२ डॉलरवर, तर ब्रेंट ०.७८ टक्क्यांनी घसरून ६३.६५ डॉलर पातळीवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या कमी किंमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी हाेतील. एरोल ब्रोकिंगचे अनुज गुप्ता म्हणाले, “वाढत्या कोरोना व्हायरसचे प्रमाण आणि कमी मागणी यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...